पार्थच्या ‘त्या’ मागणीवरुन राजकारण नको - रोहित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:38 IST2020-08-08T05:38:28+5:302020-08-08T05:38:56+5:30

पवार यांनी ‘लोकमत’च्या नगर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी सुशांतसिंग प्रकरणाकडे लक्ष वेधले

No politics from Perth's 'that' demand | पार्थच्या ‘त्या’ मागणीवरुन राजकारण नको - रोहित पवार

पार्थच्या ‘त्या’ मागणीवरुन राजकारण नको - रोहित पवार

अहमदनगर : अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात चांगला तपास व्हावा या हेतूनेच पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यांनी ‘सीबीआय’चा उल्लेख केला असला तरी या प्रकरणाचा चांगला तपास व्हावा हेच त्यांना सुचवायचे आहे. याचा अर्थ ते मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवत आहेत किंवा खरोखर सीबीआय चौकशीच्या बाजूने आहेत असे नव्हे. त्यांच्या मागणीचा राजकीय अर्थ काढायला नको, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिली.

पवार यांनी ‘लोकमत’च्या नगर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी सुशांतसिंग प्रकरणाकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, ‘विरोधक या प्रकरणात विनाकारण सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. विरोधकांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते माध्यमांसमोर जाहीर करावेत’. पार्थ यांनीही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, त्यांच्या पत्रात ‘सीबीआय’चा उल्लेख असला तरी पत्रामागील हेतू तो नाही. राजकारणात एखादा शब्द पकडून राजकारण केले जाते.

Web Title: No politics from Perth's 'that' demand