शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलामध्ये दुस:या दिवशीही नो एंट्री!

By admin | Updated: June 22, 2014 00:47 IST

पोलीस बळाचा वापर करण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे सलग दुस:या दिवशी पालिकेचा कारवाईचा प्रयत्न फसला़ परिणामी, कारवाईच्या इराद्याने गेलेले अधिकारी दुपारीच हात हलवित माघारी परतल़े

रहिवासी आक्रमक : पोलीस बळाचा वापर न केल्याने पालिका प्रशासनाचा कारवाईचा प्रय} फसला
मुंबई : बेकायदा फ्लॅट्सचे वीज-गॅस मीटर तोडण्यासाठी पालिकेचे पथक आज पुन्हा कॅम्पा कोला कम्पाउंडबाहेर धडकल़े मात्र रहिवाशांची आक्रमक भूमिका, अधिका:यांचे मवाळ धोरण आणि पोलीस बळाचा वापर करण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे सलग दुस:या दिवशी पालिकेचा कारवाईचा प्रयत्न फसला़ परिणामी, कारवाईच्या इराद्याने गेलेले अधिकारी दुपारीच हात हलवित माघारी परतल़े
शुक्रवारपासूनच कॅम्पा कोलाच्या तीन प्रवेशद्वारांना रहिवाशांनी कुलूप लावले आह़े मात्र रात्रभर चर्चेची खलबतं चालल्यानंतर पोलीस बळाचा वापर न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला़ प्रशासनाच्या या मवाळ भूमिकेमुळे सलग दुस:या दिवशी कॅम्पा कोलाच्या रहिवाशांपुढे पालिका अधिकारी हतबल झालेले दिसून आल़े त्यामुळे दुपारी पावणोबारा वाजता आलेले पालिकेचे पथक अवघ्या दोन तासांमध्ये कारवाई गुंडाळून माघारी परतल़े
गॅस व वीज कंपन्यांच्या कर्मचा:यांना सोबत आणलेल्या अधिका:यांनी रहिवाशांची मनधरणी करून पाहिली़ तासभर हा प्रयत्न झाल्यानंतर चर्चेसाठी ब्रेक घेत दीड वाजता पुन्हा पालिका अधिकारी बी़वाय. अपार्टमेंटजवळच्या प्रवेशद्वारावर आल़े मात्र अधिका:यांनी दिलेल्या कायदेशीर कारवाईच्या धमक्याही रहिवाशांना भय 
घालू शकल्या नाहीत़ अखेर, 
उद्या परत कारवाईसाठी येणार असल्याची ताकीद देत अधिका:यांनी कॅम्पा कोलाबाहेरून काढता पाय घेतला़ (प्रतिनिधी)
 
च्कारवाईसाठी पालिका अधिकारी प्रवेशद्वारावर येताच रहिवाशांनी होम-हवन सुरू केल़े गायत्री मंत्र म्हणत अधिका:यांना प्रवेशद्वाराबाहेरच थोपवून धरण्याचा प्रयत्न सुरू होता़ मात्र अशा होमहवनाचा आमच्यावर परिणाम होणार नाही़ सरकारी कामात अडथळा आणू नका, आम्ही पोलीस बळाचा वापर करणार नाही़ वीज व गॅस मीटर शांततेत तोडून जाणार, असा सूर उपायुक्त आनंद वाघ्राळकर यांनी लावला़ 
च्सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास याचिका दाखल 
केली जाईल, असा इशाराही रहिवाशांना दिला़ मात्र 2 तासांत कारवाईचे हे 
नाटय़ गुंडाळून अधिकारी पालिका मुख्यालयातील वरिष्ठांकडे कारवाईची पुढील दिशा ठरविण्यासाठी निघून गेल़े
 
गो़रा़ खैरनार मैदानात
‘डिमोलिशन मॅन’ म्हणून ओळखले जाणारे पालिकेचे माजी उपायुक्त गो़रा़ खैरनार आज कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना भेट देण्यासाठी आले होत़े विकासकाच्या चुकांचा भरुदड रहिवाशांना कशाला? या प्रकरणात विकासक व पालिका अधिकारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया खैरनार यांनी या वेळी दिली़
रहिवाशांवर गुन्हा दाखल
या कारवाईचे चित्रीकरण केले जात असल्याने विरोध करणा:या रहिवाशांविरोधात आठवडय़ाभरात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी पालिकेने सुरू केली आह़े त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल कलम 353 अंतर्गत रहिवाशांवर वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आह़े