शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

हॉटेल,बारच्या नुतनीकरणातील पोलिसांचा अडथळा दूर, ‘एनओसी’ची गरज नाही, गृह विभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 20:00 IST

वस्तू सेवा कराच्या(जीएसटी)जाचक अटीमुळे काहीस्या अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, बार, परमिटरुम व रेस्टॉरंटच्या मालकासाठी एक खुशखबर आहे.

- जमीर काझी मुंबई - वस्तू सेवा कराच्या(जीएसटी)जाचक अटीमुळे काहीस्या अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, बार, परमिटरुम व रेस्टॉरंटच्या मालकासाठी एक खुशखबर आहे. आपल्या अस्थापनाच्या नुतनीकरणाच्या परवान्यासाठी त्यांना आता संबंधित पोलीस ठाण्यात येरझा-या घालाव्या लागणार नाही. त्यासाठी आता ‘ना हरकत दाखल्या’ची (एनओसी) आवश्यकता भासणार नाही.जिल्हाधिकारी कार्यालयातून त्याच्या विना त्यांना लायसन्स दिले जाणार आहे.परवानाच्या नुतनीकरणासाठी पोलिसांकडून ‘एनओसी’ घेताना बार व हॉटेल मालकांना नाहक वेठिस धरले जात असल्याच्या तक्रारी संघटनेच्यावतीने वारंवार केल्या जात होत्या.त्याचप्रमाणे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यामध्येही नुतनीकरणासाठी पोलिसांच्या मंजुरी घेण्याची तरतूद नाही, त्यामुळे यापुढे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.जीएसटी लागू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यामध्ये हॉटेल व परमिटवाल्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांना थोडा फार दिलासा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.हॉटेल, परमिटरुम व रेस्टॉंरट सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमुद केलेल्या अटी व नियमांची पूर्तता करुन त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी पहिल्यादा संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्यातून परवानगी घ्यवी लागते. त्यामध्ये संबंधित हॉटेल, बार चालकाचा पूर्व चारित्र्य, त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे तसेच जातीय व इतर दंगलीच्या अनुषंगाने परिसरातील कायदा व सुव्यस्थेचा आढावा घेवून परवानगीबाबतचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे एकदा सर्व बाबींची पडताळणी केली जात असताना पुन्हा नुुतनीकरणासाठी त्या सर्व चाचण्याचे सोपास्कार पार पाडण्याची आवयकता नाही, पोलिसांशी ‘अर्थ’पूर्ण चर्चा केल्याशिवाय ‘एनओसी’ दिली जात नाही, अशी ओरड बार मालकांकडून केली जात होते. त्यामुळे हा त्रास टाळण्याची मागणी वारंवार होत होती. राज्य सरकारने त्याला आता सकारात्मक प्रतिसाद दिला असून परवाना नुतनीकरणासाठी आता पोलिसांचा ‘ना हरकत’ घेतला जावू नये, असे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत. त्याबाबत राज्यातील पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, अधीक्षक,सर्व जिल्हाधिकाºयांना सूचना करण्यात आल्या असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले. पोलिसांची ‘अर्थ’पूर्ण चर्चाएखाद्या हॉटेल, बारच्या परवानगीसाठी ‘एनओसी’ घेण्यासाठी संबंधित हद्दीतील पोलीस ठाण्याच्या बीट मार्शलपासून ते वरिष्ठ निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्त ते उपायुक्त कार्यालयापर्यत हात ‘ओले’ करावे लागतात, त्यासाठी अर्ज पुढे पाठविला जात नसल्याची परिस्थिती आहे. काही मोजक्या अधिका-यांचा अपवाद वगळता सरसकट ‘अर्थ’पूर्ण चर्चा करावीच लागते. त्याचबरोबर दर महिन्याला ठराविक हप्ता बांधून द्यावा लागतो, असे बार मालकांच्याकडून सांगण्यात आले. यापुढे बार, हॉटेलचे लायसनला मंजुरी मिळण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीची पूर्व चारित्र्य, परिसरातील कायदा व सुव्यवस्था, जातीय व अन्य दंगलीबाबत काटेकोर माहिती घेवून मंजूरी द्यावी, नुतनीकरणासाठी अशा पडताळणीची आवश्यकता नाही, अशा सूचना पोलीस विभागाला देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :hotelहॉटेलMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार