क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 23:29 IST2020-01-19T23:28:31+5:302020-01-19T23:29:05+5:30
एरवी राजकारणाच्या ‘पीच’वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. परंतु...

क्रिकेटच्या मैदानात नितीन गडकरींची ‘फटकेबाजी’
नागपूर - एरवी राजकारणाच्या ‘पीच’वर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चौफेर फटकेबाजी करताना दिसून येतात. परंतु रविवारी रात्री त्यांनी क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करुन सर्वांनाच अचंबित केले. खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेदरम्यान छत्रपती नगर मैदानात त्यांनी फलंदाजी केली. यावेळी त्यांनी मैदानाच्या चहुबाजूनी फटके मारले व त्यांच्या फटकेबाजीचा उपस्थितांनी आनंद लुटला.