महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी २२५२ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; गडकरींची घाेषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 07:46 AM2022-03-20T07:46:43+5:302022-03-20T07:47:57+5:30

ग्रामीण भागातील दळणवळण सुधारणार

nitin gadkari announces 2252 crore for road development projects in Maharashtra | महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी २२५२ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; गडकरींची घाेषणा

महाराष्ट्रातील रस्ते विकासासाठी २२५२ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी; गडकरींची घाेषणा

Next

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण व बळकटीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने २२५२ कोटी ६० लाख रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये ग्रामीण व आदिवासी भागातील महामार्गांचा समावेश अधिक आहे. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाची व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी गडकरी यांनी राज्यभरातील विविध प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यासाठी भरघाेस निधी उपलब्ध करून दिला आहे. भाम्हापुरी-वडसा-कुरखेचा-कोरची-देवरी आमगाव रस्ता व लेंधारी पूल या छोट्या पुलाची बांधणीस मंजुरी दिली.

या कामांनाही दिली मंजुरी
राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील इंजेगाव-सोनपेठ-पाथरी-सेलू-देगाव फाटा रस्त्याच्या पाथरी ते सेलू विभाग आणि सेलू ते देवगाव फाटा विभाग चौपदरीकरण
राष्ट्रीय महामार्ग-७५३ एचवरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग या रस्त्याचे दुपदरी तसेच चौपदरीकरण, पुनर्वसन व अपग्रेडेशन.
नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट व माहूर ते अरणी राेड हा दोन पदरी रस्त्याचे चौपदरीकरण. त्यासाठी २०६ कोटी रुपये मंजूर

गडचिरोली
नक्षलप्रभावित असलेल्या या जिल्ह्यात गडचिरोली ते ढवळी या रस्त्यावरील राजोली, पांधसाळा, बोदली, मेड तुकुम हा २८ किलाेमीटर लांबीचा रस्ता चार पदरी हाेणार आहे. अपेक्षित खर्च १३१६.४४कोटी

कुरखेडा 
कुरखेडा येथून जाणारा महामार्ग चार पदरी केला जाणार आहे. यात दोन पुलांचाही समावेश आहे. अपेक्षित खर्च पुनर्वसन आणि अपग्रेडेशनसाठी
१६३.८६कोटी भुतीनाला आणि सती नदीवर मोठे पूल बांधण्यात येणार आहेत.

बुलडाणा
चिखली, दाभाडी व तळेगाव हा दोन पदरी रस्ता चार पदरी केला जाणार आहे. ३५०.७५ कोटी रूपये खर्च होतील.
राष्ट्रीय महामार्ग-१६० च्या उंडेवाडी कडेपठार ते देशमुख चौक व धवन पाटील चौक (बारामती) ते फलटण हा पुणे जिल्ह्यातील ३३ किलाेमीटरचा रस्ता चार पदरी केला जाणार आहे.

या कामांनाही दिली मंजुरी
राष्ट्रीय महामार्ग ५४८ बी वरील इंजेगाव-सोनपेठ-पाथरी-सेलू-देगाव फाटा रस्त्याच्या पाथरी ते सेलू विभाग आणि सेलू ते देवगाव फाटा विभाग चौपदरीकरण
राष्ट्रीय महामार्ग-७५३ एचवरील भोकरदन ते कुंभारी फाटा आणि राजूर ते जालना विभाग या रस्त्याचे दुपदरी तसेच चौपदरीकरण, पुनर्वसन व अपग्रेडेशन.
नांदेड-भोकर-हिमायतनगर-किनवट व माहूर ते अरणी राेड हा दोन पदरी रस्त्याचे चौपदरीकरण. त्यासाठी २०६ कोटी रुपये मंजूर

Web Title: nitin gadkari announces 2252 crore for road development projects in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.