शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

Nitesh Rane Exclusive: "राणे-राज-उद्धव हे एकत्र आले असते तर...; परंतु ‘त्या’ लोकांना हे नकोय", नितेश राणेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 17:13 IST

राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे.

ठळक मुद्देवैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाहीबाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांच्यावर टीका करण्याची संधी शिवसेनेचे नेते सोडत नाही. मात्र अशातच आमदार नितेश राणे यांनी लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात हाडवैर नाही तर ते बनवलं गेले. शिवसेनेतील काही मंडळी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना चुकीचं सांगत असतात. ती माणसं त्यांच्या लक्षात आली तर उद्धव ठाकरेंचे भले होईल असं नितेश राणे म्हणाले आहे.

भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी सांगितले की, कोरोना काळात आमच्या हॉस्पिटलच्या उद्धाटनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची शेवटची भेट झाली. मी आणि आदित्यही एकदा भेटलो होते. आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले नाते होते. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय. राणे-राज-उद्धव एकत्र असते तर आज महाराष्ट्रासाठी वेगळं चित्र असतं. उद्धव ठाकरेंना कोण जवळचं आहे हे ओळखता आलं तर आदित्य आणि शिवसेनेसाठी चांगले आहे. संजय राऊतांनी लोकप्रभात असताना सातत्याने बाळासाहेब-मासाहेब यांच्यावर टीका केली होती. ज्या दिवशी संजय राऊतांबद्दल उद्धव ठाकरे यांना कळेल तेव्हा त्यांचे भलं होईल असं ते म्हणाले आहेत.

तसेच राणेंना शिवसेनाबद्दल इतकं माहिती आहे की, काही घटना, आडनावं सांगितली तर  शिवसेनेला ते जड जाईल हे माहिती आहे. परंतु राजकारण हे राजकारणासाठी असतं. वैयक्तिक टीका झाली तर त्याला उत्तर देण्यास आम्हीही कमी पडणार नाही. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. जर महाराष्ट्र हिताच्या दृष्टीने, तरुणांच्या रोजगाराबद्दल काही सकारात्मक प्रस्ताव घेऊन यायचे असतील. तर निश्चितच नारायण राणे(Narayan Rane) हे त्यासाठी पुढाकार घेतील असंही नितेश राणे यांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊत(Sanjay Raut) यांनी लोकप्रभामध्ये असताना मासाहेबांवर टीका केली होती. बाळासाहेबांबद्दल टीका करत होते. संजय राऊत हे पवारांसाठी काम करतात हे सगळ्यांना माहिती आहे. सामनाची जबाबदारी बाळासाहेबांनी राऊतांवर दिली कारण बाळासाहेबांचे मन खूप मोठं होतं. बाळासाहेब देवमाणूस होते. संजय राऊत यांचा उद्देश समजून घ्यायला पाहिजे. पवारांचं काम संजय राऊत करतायेत. नारायण राणे यांना डिवचायचं आणि ठाकरेंविरोधात बोलायला लावायचं, मग अनेक प्रकरण बाहेर काढायची. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार पडण्यास भाग पाडायचं यातून भलं कुणाचं होणार हे सगळ्यांना माहिती आहे असंही नितेश राणे यांनी सांगितले.   

पाहा व्हिडीओ

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे Nitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊतAnil Parabअनिल परबUddhav Thackerayउद्धव ठाकरे