शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा प्रवास दोन रुपयांनी महागणार

By admin | Updated: May 15, 2015 05:13 IST

रिक्षा-टॅक्सींच्या मूळ भाड्यात १ रुपयाने वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने नुकताच घेतला. या भाडेवाढीबरोबरच रिक्षा-टॅक्सींचा रात्री

मुंबई : रिक्षा-टॅक्सींच्या मूळ भाड्यात १ रुपयाने वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने नुकताच घेतला. या भाडेवाढीबरोबरच रिक्षा-टॅक्सींचा रात्री १२नंतरचा प्रवासही महागणार आहे. रात्री १२ वाजल्यापासूनच्या सुरुवातीच्या प्रवासात २ रुपयांनी वाढ होत असल्याचे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ निश्चित करण्यासाठी परिवहन विभागाकडून हकिम समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या सूत्रानुसार, दरवर्षीच्या मे महिन्यात नवीन भाडे निश्चित केले जाते. वाढत्या महागाईचा दर पाहून आणि सूत्र वापरून ही भाडेवाढ केली जात असून, यंदा १ जूनपासून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्याचा निर्णय एमएमआरटीएने घेतला आहे. त्यानुसार रिक्षाचे भाडे १७ वरून १८ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २१ रुपयांवरून २२ रुपये होणार आहे. या मूळ भाड्यात वाढ होत असतानाच रात्री १२नंतरच्या प्रवासातही चांगलीच वाढ होत असल्याचे आरटीओतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. रात्री १२ ते पहाटे ५ या प्रवास कालावधीसाठी भाड्याच्या २५ टक्के एवढे अतिरिक्त भाडे देय आहे. ते ३0 टक्के एवढे करण्यात यावे, अशी शिफारसही हकिम समितीकडून करण्यात आली आहे. मात्र शासनाकडून रात्रीच्या प्रवासावर २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याची मान्यता देण्यात आल्याने आतापर्यंत हीच आकारणी होत आहे. हे पाहता यंदा १ जूनपासून होणाऱ्या भाडेवाढीत रात्री १२नंतरचा सुरुवातीचा प्रवास २ रुपयांनी महागणार असल्याचे सांगण्यात आले. सध्या रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत सुरुवातीचे रिक्षाचे भाडे २१ रुपये आहे. हे भाडे २३ रुपये एवढे होईल. तर टॅक्सीचे भाडे २६ रुपये असून, ते २८ रुपये होणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.