शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’तील पुढचे ठिकाण औरंगाबाद

By admin | Updated: August 22, 2015 00:30 IST

मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल. शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर

मुंबई : मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल. शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात समावेश असल्याने आगामी काळात औरंगाबाद हे गुंतवणुकीचे केंद्र म्हणून उदयास येईल. स्मार्ट सिटी प्रस्तावातहत डीएमआयसी प्रकल्पावर भर दिला जाण्याची शक्यता आहे, असे नागरी विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून निवड कण्यात आलेल्या दहा शहरांसाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची तज्ज्ञ सल्लागार (मेन्टॉर) म्हणून नियुक्ती केली असून औरंगाबादसाठी अपूर्वा चंद्रा (उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिव) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसाठी देशभरातील अन्य ९० शहरांसोबत राज्यातील दहा शहरे असल्याने तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, पुणे-पिंप्री-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि औरंगाबादची निवड करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी या शहरांना स्वत:ची योजना तयार करावी लागणार आहे, त्यासाठी अनुभवी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे नागरी विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना संबंधित शहराची सखोल माहिती असावी आणि त्यांनी यापूर्वी संबंधित शहरात किंवा महापालिकेत काम केलेले असावे, याची दक्षता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे, असे म्हैसकर यांनी सांगितले.दहा शहरांचे मेन्टॉर....अपूर्वा चंद्रा-औरंगाबाद, नितीन करीर-पुणे-पिंप्री-चिंचवड, अजय मेहता-मुंबई, मनूकुमार श्रीवास्तव-ठाणे, संजय भाटिया-नवी मुंबई, यू.पी.एस. मदान-कल्याण-डोंबिवली, प्रवीण परदेशी- नागपूर, मिलिंद म्हैसकर-सोलापूर.देशभरात १०० स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी केंद्राची ४८ हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे.