शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

वेळेत उपचार न मिळाल्याने पालघरमध्ये नवजात बालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:22 IST

खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील संतापजनक प्रकार

रवींद्र साळवेलोकमत  न्यूज  नेटवर्क मोखाडा : पालघर जिल्ह्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य  केंद्रात गरोदर मातेला वेळेवर उपचार  न मिळाल्याने प्रसूतीनंतर नवजात  बालकाचा  मृत्यू  झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. 

या घटनेला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व संबंधित यंत्रणा जबाबदार असून दोषींवर कडक कारवाईची  मागणी कुटुंबीयांनी केली  आहे. संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

खोडाळा येथील तळ्याचीवाडी येथील मयूरी  अनिल वाघ (वय १९) या  गरोदर मातेला रविवारी दुपारी २.३० वाजेच्या  दरम्यान  पोटात दुखू लागल्याने खोडाळा प्राथमिक  आरोग्य  केंद्र खोडाळा येथे दाखल केले, परंतु तेथे उपचार न करता उपचार प्रक्रियेला गरोदर माता  व नातेवाईक सहकार्य करत  नसल्याचे कारण पुढे करून मोखाडा ग्रामीण  रुग्णालयात दाखल होण्यास डॉक्टरांनी सांगितले, असे कुटुंबीयांचे  म्हणणे आहे. मोखाड्याचा एक तासाचा प्रवास करून ग्रामीण  रुग्णालयात दाखल होताच १५ मिनिटांत महिला बाळंत झाली, मात्र बाळ दगावले. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत उपचार मिळाले  असते तर बाळ दगावले नसते. घटनेला उपकेंद्राचे डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी गरोदर मातेचे वडील काशिनाथ भोई यांनी केली आहे.

आधीही गेले आहेत बळी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभारामुळे याअगोदरही अनेकदा बळी गेले आहेत. यामुळे वारंवार घडणाऱ्या प्रकाराला जबाबदार कोण? यावर कुणी कारवाई करणार आहे की नाही?, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

रुग्णालयांतील पदे रिक्त पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांवर योग्य प्रकारे उपचार होत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्याच्या घटना सर्रास घडत असतात. यामुळे नाराजी व्यक्त होत असून रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली जात आहे.

रुग्णालयाचे म्हणणे काय?याबाबत अधिक माहितीसाठी खोडाळ्याचे वैद्यकीय अधीक्षक स्वप्निल वाघ यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आरोग्य सेवेच्या कामात आहे, नंतर बोलतो, असे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी भाऊसाहेब चत्तर यांच्याशी  संपर्क  केला. ते म्हणाले की, मी या घटनेची  माहिती घेतली असून सोनोग्राफीनुसार बाळाचे आकारमान जास्त होते व त्याच्या मानेला नाळेचा वेढा होता. ही प्रसूती करणे कठीण होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. घडलेली घटना दुर्दैवी आहे. याची आम्ही चौकशी करू. ग्रामीण रुग्णालयात सेवेवर असलेले डॉक्टर देवधरे यांनी सांगितले की, वेळेत उपचार झाले असते तर बाळ वाचले असते.

टॅग्स :Healthआरोग्य