शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

रेल्वेचे नवीन वेळापत्रक बुधवारपासून लागु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 9:40 PM

रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनापासून देशातील रेल्वेगाड्यांचे नवीन वेळापत्रक लागु केले जाणार आहे.

ठळक मुद्देकेवळ काही लोकल, डेमू व पॅसेंजर गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या

पुणे : रेल्वे मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे स्वातंत्र्य दिनापासून देशातील रेल्वेगाड्यांचे नवीन वेळापत्रक लागु केले जाणार आहे. या वेळापत्रकामध्ये पुणे विभागातील गाड्यांच्या वेळापत्रकात फारसा बदल झालेला नाही. पुणे स्थानकातून सुटणाऱ्या बहुतेक एक्सप्रेस गाड्यांच्या वेळा पुर्वीप्रमाणे असतील. केवळ काही लोकल, डेमू व पॅसेंजर गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे-दौंड डेमू, लोणावळा ते पुणे आणि पुणे ते सातारा मार्गावरील काही गाड्यांचे वेळापत्रक प्रवाशांच्या मागणीनुसार बदलण्यात आले आहे. तर काही एक्सप्रेस गाड्यांचे वेळा प्रवाशांसाठी अनुकूल करण्यात आल्या आहेत. सुधारीत वेळापत्रकानुसार लोणावळ्याहून ९९८०५ क्रमांकाची लोकल सकाळी ७.४० सुटून पुणे स्थानकात ९.१५ वाजता पोहचेल. पुणे-दौंड डेमु (७१४०९) ही दुपारी २.४० वाजताची गाडी आता २.४५ वाजता रवाना होईल. प्रवाशांच्या मागणीनुसार पुणे-सातारा पॅसेंजर (५१४३५) या गाडीचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुर्वी ही गाडी सायंकाळी ५.०५ वाजता पुणे स्थानकात सोडण्यात येत होती. आता ही गाडी ६.१० वाजता साताऱ्याकडे प्रस्थान करून १०.२५ वाजता पोहचेल. कोल्हापुर-पुणे (५१४१०) या पॅसेंजरचा वेगही वाढविला जाणार आहे. त्यामुळे ही गाडी पुवीर्पेक्षा पावणे दोन तास लवकर म्हणजे २.४० वाजता पुण्यात पोहचेल. पुणे-दौंड (७१४०७) व दौंड-पुणे (७१४०८) या डेमु गाड्यांना नियमित करण्यात आले आहे. या गाड्या अनुक्रमे पुण्याहून पहाटे ३.१५ वाजता तर दौंडहून पहाटे ५.४० वाजता सुटतील. दुपारी १२.५० वाजता सुटणारी कोल्हापुर-अहमदाबाद (११०५०) एक्सप्रेस आता १२ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. तर पुणे-जयपुर (१२९३९) व पुणे-इंदौर (२२९४३) एक्सप्रेस या गाड्या दुपारी ३.३५ ऐवजी दुपारी साडे तीन वाजता रवाना होतील. कोल्हापुर-तिरूपती हरीप्रिया (१७४१६) एक्सप्रेसची वेळ पाच मिनिटे अलीकडे करण्यात आली आहे. ही गाडी आता सकाळी ११.३० वाजता कोल्हापुर स्थानकातून सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.---------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीlocalलोकल