शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण! शिवसेना-वंचित बहुजन आघाडी युतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 15:41 IST

वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील अशी घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली.

मुंबई - सध्या राजकारणात काही वाईट परंपरा, चाली सुरू आहेत. त्यावर आघात करण्यासाठी ठाकरे-आंबेडकराची पुढची पिढी वारसदार एकत्र येऊन देश प्रथम या उद्दिष्टावर काम करणार आहोत असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा मुंबईत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. 

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला भ्रमात ठेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल केली जातेय. नको त्या वादात अडकवून आपले इच्छित साधायचं. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही सुरू आहे ते पोहचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा. निकालानंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात त्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी सांगितले. 

तर वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केला. जी चळवळ आम्ही चालवत होतो तिला आमच्याच मित्रपक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो. जिंकून आणणं हे मतदारांच्या हाती आहे. ते राजकीय पक्षाच्या हातात नाही. मात्र उमेदवारी देणे राजकीय पक्षाच्या हाती आहे. नातेवाईकांचे राजकारण जसं जसं वाढत गेले तसे गरीबांचे राजकारण बाजूला पडत गेले. भांडवलशाहीचे, लुटारुंची अशी सत्ता सुरू झाली. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होणार  मोदींनी भाजपामधील नेतृत्वही संपवले आहे. सत्तेचा अमरपट्टा कुणी घेऊन आले नाही. नरेंद्र मोदी यांचाही अंत होणार. संकटात राजकीय नेतृत्व उभं राहते असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जिथे जिथे प्रादेशिक पक्ष स्वत:चं नेतृत्व उभे करत असेल तिथे आम्ही मदत करू. राजकारण हे मुद्देसूद, नितीमत्तेवर करू. शरद पवारांसोबत जुने भांडण, शेतातलं भांडण नाही. नेतृत्वाचं भांडण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा आम्ही बाळगतो असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरShiv SenaशिवसेनाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी