शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

कर्जमाफी न मिळालेल्या लाखो शेतकऱ्यांना नवे कर्ज; कापूस खरेदी चौपटीने करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 2:21 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

मुंबई : राज्यात अद्याप महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या ११ लाख १२ हजार शेतकऱ्यांनादेखील खरीप हंगामासाठी नवे पीक कर्ज देण्यात येणार आहे. तसेच कापूस खरेदीचा वेग चौपटीने वाढविण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.कर्जमुक्ती योजनेसाठी ३० लाख लाभार्थी शेतकºयांची यादी सहकार विभागाने निश्चित केली होती. मार्चपर्यंत त्यातील १९ लाख शेतकºयांच्या खात्यात १२ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ११ लाख १२ हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत. लॉकडाउनमुळे सरकारी यंत्रणा जवळपास ठप्प झाली आहे. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठीच्या खर्चाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे ८ हजार १०० कोटी रुपयांची कर्जमाफी देता आली नाही. ज्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यांना थकबाकीदार म्हणून गृहीत न धरता नव्या कर्जाचा लाभ देण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. खरीप हंगामासाठी ४४ हजार कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य मंत्री उपस्थित होते. राज्यात बियाण्यांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली. प्रयोगशील शेतकºयांची रिसोर्स बँक केली असून शेतकरी शास्त्रज्ञ मंच देखील स्थापन केल्याची माहिती त्यांनी दिली.‘अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या’कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केले. पीक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. कोरोनामुळे शेतीबरोबरच अन्य कुठल्या क्षेत्रात आव्हाने आहेत यावर चर्चा करण्यासाठी सविस्तर बैठक लवकर घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.दररोज दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करा - अजित पवारकापूस, मका, तूर,हरभरा, ज्वारी, धानाची खरेदी वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले. ही खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे वृत्त लोकमतने गुरुवारच्या अंकात दिले होते. कापसाची खरेदी कोणत्याही परिस्थितीत २० जूनपर्यंत संपायला हवी. दररोज दोन लाख क्विंटल कापूस खरेदी करा, असे पवार यांनी सांगितले. कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढूशकेल, असे ते म्हणाले .

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीcottonकापूस