शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
तपोवनाचा मुद्दा, ठाकरे बंधूंची सभा; नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेनेला किती जागा मिळणार?
3
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
4
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
5
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
6
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
7
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
8
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
9
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
10
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
11
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
12
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
13
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
14
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
15
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
16
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
17
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
18
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
19
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
20
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांसमोर नवा पेच, अजित पवारांसोबत जाण्याला प्रशांत जगताप यांचा विरोध; थेट राजकारण सोडण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:50 IST

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भूमिका मांडली. दोन्ही पक्ष एकत्र आले तर आपण राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. पुढच्या काही दिवसात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पदाधिकाऱ्यांच्या नाराजी असल्याचे समोर आले आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भूमिका मांडत या निर्णयाला विरोध केला होता. 

मतांची चोरी नाही, आता दरोडा सुरू आहे, सर्व पक्षीय बैठकीत SIR चा मुद्दा उपस्थित; संसदेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होणार

"सध्या राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. याबाबत माझं मत आहे की, राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. जर एकत्र लढायची वेळ आली तर प्रशांत जगताप काही काळासाठी राजकारणातून बाहेर पडेल. माझं अजित पवार यांच्याविषयी काहीही मत नसून शरद पवारांची पुरोगामी चळवळ बघून मी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या अजित पवार भाजपासोबत आहेत. त्यांचं तिथं पटत नाही म्हणून त्यांना सोबत घेतलं आणि उद्या परत ते सत्तेत जाऊन बसतील, हे न पटणारं आहे. पुणेकर महायुतीवर नाराज असून ते महाविकास आघाडी सोबतच आहेत. जर दोन्ही पक्ष एकत्र आले, तर जोपर्यंत राजकारण स्वच्छ होत नाही तोपर्यंत मी राजकारणातून बाहेर पडेल, असे सांगत प्रशांत जगताप बाहेर प़डण्याचे संकेत दिले होते.

दरम्यान, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी एक पुणेकर म्हणून अशी अपेक्षा की प्रशांतदादा जगताप यांनी असा निर्णय घेऊ नये. या पुण्यनगरीच्या राजकीय पटलावर जेव्हा जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा तेव्हा आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. आपल्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याने असा निर्णय घेऊ नये. आपल्या हातून या पुण्यनगरीची अजून खूप सेवा बाकी आहे, असे म्हटले आहे. 

माजी आमदार धंगेकर यांचे ट्विट काय? 

"प्रशांतदादा जगताप यांच्या बाबतीत काही बातम्या माध्यमांमध्ये पहिल्या,अर्थात आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा यांच्या संभाव्य युतीनंतर राजकारणातून विश्रांती घेण्याबाबतीत विचार करत असल्याचे समजते.

आता पवारसाहेब आणि अजितदादा काय निर्णय घेतील ते माहित नाही परंतु एक पुणेकर म्हणून अशी अपेक्षा की प्रशांतदादा जगताप यांनी असा निर्णय घेऊ नये. या पुण्यनगरीच्या राजकीय पटलावर जेव्हा जेव्हा काही चुकीचे घडते तेव्हा तेव्हा आवाज उठविणारा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख आहे. आपल्यासारख्या लढवय्या कार्यकर्त्याने असा निर्णय घेऊ नये. आपल्या हातून या पुण्यनगरीची अजून खूप सेवा बाकी आहे", असंही आपल्या ट्विटमध्ये धंगेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता या पोस्टला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी रिप्लाय दिला आहे. "धन्यवाद @DhangekarRavii  भाऊ, आपले पाठबळ खरोखर मला सुखावणारे आहे ! आपण राजकारणात कोणत्याही पदासाठी, सत्तेसाठी नव्हे, तर पुणेकरांच्या सेवेसाठी आलो. पुरोगामी विचारांची चळवळ बुलंद करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं. नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून मी प्रचंड संघर्ष केला. युत्या, आघाड्यांमध्ये हा संघर्ष मातीमोल होऊ नये, पुरोगामी विचारांशी तडजोड होऊ नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे, असेही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar faces new challenge: Prashant Jagtap opposes joining Ajit Pawar.

Web Summary : Prashant Jagtap opposes Sharad Pawar faction joining Ajit Pawar's group for Pune elections. He signaled leaving politics if alliance occurs. Shiv Sena's Ravindra Dhangekar urged him to reconsider, citing his importance as activist.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र