शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचे नवे विधेयक

By admin | Updated: December 24, 2014 03:03 IST

मराठा समाजाला शिक्षणात आणि राज्यातील नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने विधानसभेत गदारोळात मंजूर करून घेतले

मुंबई - मराठा समाजाला शिक्षणात आणि राज्यातील नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने विधानसभेत गदारोळात मंजूर करून घेतले. तर मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करताना सरकारने मुस्लीम समाजाच्या शैक्षणिक आरक्षणावर कोणतीच भूमिका न घेतल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. मागील सरकारने मुस्लीम आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाची मुदत आज संपली. त्यामुळे युती सरकारने आज मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सभागृहात मांडले. पण त्यात मुस्लीम आरक्षणाचा उल्लेख नसल्याने विरोधकांनी घोषणाबाजी केली. गोंधळातच हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले आणि सभागृह तहकूब केले गेले. सभागृह पुन्हा सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करण्याला कोणाचाच विरोध नव्हता; मात्र मुस्लीम समाजाला जे आरक्षण ज्या अध्यादेशाद्वारे मिळाले आहे त्याची मुदत आज संपत आहे. त्यामुळे तातडीने अध्यादेश काढावा, एवढीच आमची मागणी होती. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सरकारचा हेतू शुद्ध नाही. न्यायालयाने जे दिले ते तुम्ही त्या समाजाला देत नाहीत. समाजनिहाय वेगळे निकष लावणे योग्य नाही. विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावत, आज मंजूर झालेल्या विधेयकाचा मोठा फायदा न्यायालयात होईल असे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत सांगितले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले, शिक्षणात जे आरक्षण मिळाले आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास वेळ आहे. तोपर्यंत अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे मत मागून घेतले जाईल. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुभंगलेला आहे. त्यातून कायदेशिर प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकार भेदभाव मानत नाही. मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळवून देण्यास आम्ही बांधील आहोत, असेही फडणवीस म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)