शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गाला पर्यायी नवीन मार्ग बनणार; कॅबिनेटच्या पायाभूत सुविधा समितीची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:17 IST

या नव्या महामार्गामुळे नवी मुंबई, कर्जत आणि पुणे यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी तयार होईल. यामुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासाला चालना मिळेल.

मुंबई - मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे बऱ्याचदा हा प्रवास नकोसा वाटतो. मागील काळात या महामार्गावर एक गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल ३२ तास वाहतूक कोंडी झाली. याचा नाहक फटका वाहन चालकांना बसला. मुंबई-पुणे येण्यासाठी एक्सप्रेस मार्गाचा अधिक वापर केला जातो. परंतु आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन महामार्ग बनवण्याची तयारी केली आहे. 

रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथून हा महामार्ग पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिरूर येथे जोडला जाईल. राज्यातील अनेक भागातून येणाऱ्या वाहनांना हा सोयीस्कर महामार्ग असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे मुंबई द्रुतगती महामार्गाला पर्यायी नवीन नेरळ -शिरूर या महामार्गासह विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना समितीची तत्वत: मंजुरी देण्यात आली. या नियोजित महामार्गासाठी आवश्यक मान्यता व निधी तरतुदी बाबत कार्यवाही केली जावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांना दिले.

या महामार्गावर वाढणारी वाहतूक आणि भविष्यात वाहनांची संख्या लक्षात घेता पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲट ग्रेड) मार्गाचे कामांतील तांत्रिक तपशीलबाबत चर्चाही बैठकीत करण्यात आली. तसेच अलिबाग- विरार महामार्गाच्या अटल सेतू , मुंबई गोवा महामार्ग, पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग जोडणारे विविध नोड व पुणे–शिरूर सहा पदरी उन्नत मार्गाच्या प्रकल्पाबाबत भूसंपादन, मंजुरी प्रक्रिया, निधी तरतुदी याबाबत चर्चा करण्यात आली.

कसा असेल नवीन महामार्ग?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी नेरळ-शिरूर असा चार पदरी रस्ता बनवण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १२०० कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. या नव्या महामार्गामुळे नवी मुंबई, कर्जत आणि पुणे यांच्यात थेट कनेक्टिव्हिटी तयार होईल. यामुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स विकासाला चालना मिळेल. विशेषत: मालवाहतुकीसाठी हा नवा कॉरिडॉर उपयोगी ठरेल. सध्या नेरळ ते पुणे शिरूर या प्रवासासाठी तीन ते साडे तीन तास लागतात. या नव्या महामार्गामुळे कमी कालावधी लागू शकतो. मुंबई-पुणे एक्सप्रेसवरील वाहतुकीचा ताण कमी होईल. कर्जत, शिरूर, पुणे परिसरात नवीन इंडस्ट्रीयल झोन वाढतील.    

English
हिंदी सारांश
Web Title : New alternative route for Mumbai-Pune highway approved, easing traffic.

Web Summary : To reduce Mumbai-Pune Expressway congestion, a new Nerul-Shirur highway is planned. The project, costing approximately ₹1200 crore, will improve connectivity, reduce travel time, and boost industrial growth. The cabinet approved the project.
टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसTrafficवाहतूक कोंडी