शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

'विरोधकांना निव्वळ पोटदुखी; स्वत:च्या बुडाखाली बघा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 4:03 AM

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई : उगाच अमाप सांगायचं अन् नंतर उताणं पडायचं असं आमचं नाही. आम्ही जे करतोय ते जनतेला दिसतंय, त्यांचा विश्वास आहे; पण विरोधकांना निव्वळ पोटदुखी झाली असल्याने दिसत नसावं. ज्यांचं वय सहा ते अठरा वर्षांदरम्यान असेल तर त्यांनाही आमची कामं दिसावीत म्हणून चष्मे देऊ. भाजपच्या राज्यांमधील कायदा-सुव्यवस्थेचं काय? आधी स्वत:च्या बुडाखाली बघा, असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत केला.महिलांवरील अत्याचार ही शरमेची बाब आहेच. ते रोखण्यासाठी आम्ही कठोर कायदा आणतोय, पण उत्तर प्रदेशात दंगली होतायेत, दिल्ली जिथे पोलीस केंद्राचे आहेत तिथे शाहीनबाग घडतेय, जेएनयूमध्ये अतिरेकी घुसले. मारहाण केली, पण त्यांना पकडले नाही. भाजपवाल्यांनी स्वत:च्या बुडाखाली जळतंय की बर्फ ठेवलाय तेवढं पाहून घ्यावं, असा टोलाही त्यांनी हाणला.शेतकरी कर्जमाफी, पाच दिवसांचा आठवडा, मुलांना मोफत चष्मे, शिवभोजन योजना या उपलब्धींचा उल्लेख करून ते म्हणाले की, आमचे सरकार स्थिरावले आहे आणि काम करतेय पण ते विरोधकांच्या पचनी पडत नाही. विरोधकांनी चांगल्याला निदान चांगलं म्हणावं, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीचा बोर्ड अंदमानच्या कारागृहात काढला गेला तेव्हा भाजपचे राम कापसे हे तिथे नायब राज्यपाल होते. तेव्हा भाजपने काही हरकत घेतली नव्हती. सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहणारा ठराव आणायचे काय ते पाहू पण हिंदुत्व, सावरकर ही काही भाजपची मक्तेदारी नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी एका प्रश्नात सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तूर खरेदीत दिरंगाई होत नसल्याचे सांगितले.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी अलिकडे हैदराबादला जाऊन दिशा कायद्याची घेतलेली माहिती आणि महिला अत्याचार रोखण्यासाठी राज्यात येणारा कायदा या बाबत पत्रकारांना माहिती दिली. पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची समिती नेमली असून ती सरकारला लवकरच अहवाल देईल व पुढील अधिवेशनात त्यासंबंधीचा कायदा केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.आमची नाराजी आहेचभीमा-कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदेच्या संदर्भातील चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे ज्या पद्धतीने दिली त्याबाबत आमची नाराजी आहेच. राज्याच्या तपास यंत्रणेवर एकप्रकारे अविश्वास दाखविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.एनपीआर : मंत्र्यांची समिती नेमणार‘सीएए’बाबत मी माझी भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. एनपीआरमध्ये नेमक्या कोणत्या त्रुटी आहेत, हे तपासण्यासाठी जबाबदार मंत्र्यांची समिती नेमणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना