"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 20:49 IST2025-04-16T20:46:47+5:302025-04-16T20:49:03+5:30
"तेव्हा नेहरू पंतप्रधान होते. ते नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की, नेहरूंना देखील बंद गाडीतून महाराष्ट्रातून फिरायला लावलं त्यांनी."

"नेहरू नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे, पण महाराष्ट्रात...! तुमची मस्ती इकडे नाही चालणार"; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आज जी काही आपली मुंबई लुटली जातेय, सर्व काही गुजरात, गुजरात, गुजरात, सर्व गुजरात्यांबद्दल माझा राग नाहीचये. पण खास करून जे दोन तिकडे बसले आहेत, त्यांना कल्पना नाही महाराष्ट्राची. तेव्हा नेहरू पंतप्रधान होते. ते नेहमी उघड्या गाडीतून फिरायचे. पण मराठी माणूस एवढा पिसाळला की, नेहरूंना देखील बंद गाडीतून महाराष्ट्रातून फिरायला लावलं त्यांनी. तुमची मस्ती इकडे नाही चालणार. कुणाची मस्ती खपवून घेणारा हा महाराष्ट्र नाहीय, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते नाशिक येथे पक्षाच्या निर्धार शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, "अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक कधी होणार? कधी होणार? कधी कोण सुरुवात तरी कोण करणार? मी स्वतः हजर होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले. कुठे गेलो, काय गेलो, बोटीत बसलो गेलो. आम्हाला वाटले फडणवीस बसलेत, आता दोन ते तीन वर्षांत स्मारक होईल. मधे आपलाही काळ गेला. पण अरबी समुद्रात स्मारक होत नसेल, तर उदयनराजे बोलले ते बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा राज्यपाल मोठे नाहीत. छत्रपती शिवरायांपेक्षा दुसरे कोणी मोठे असूच शकत नाहीत."
ठाकरे पुढे म्हणाले, "काय ते राजभवन आणि काय त्यांचा थाट, कशाला हवा? राज्यपालपदाचा अवमान त्या खुर्चीवर बसणारी व्यक्तीच करणार असेल, तर तिचा मान, सर्वोच्च न्यायालयाने काय ठेवायला पाहिजे हे दाखवून दिले आहे. मग राज्यपालांना तुम्ही कुठेतरी करा शिफ्ट आणि राजभवनच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य इतिहास सांगणारे मोठे स्मारक तिथे उभे करा, ही शिवसेनेची मागणी आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.