पुणे : आर्थिक अडचणीतील बँका इतर सक्षम बँकांनी विलिनीकरण करुन घेतल्यास बँकिंग व्यवसाय सुरळीत होईल. अडचणीतील बँकेला सरकारने मदत करावी हा उपाय अगदी शेवटचा असल्याचे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बँकांच्या विलिनीकरणावर भाष्य केले. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांना बँकींग रत्न आणि सहकारी बँकींग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शीला काळे यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन गडकरी बोलत होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, विजय ढेरे या वेळी उपस्थित होते. बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाºया ३६ बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 15:09 IST
येता काळ बँकिंग क्षेत्रासाठी अडचणीचा आहे. त्यामुळे कायदा वाकवा मात्र, तो मोडणार नाही याचे भान ठेवा.
बँक विलिनीकरणाची प्रक्रिया हवी जलद : नितीन गडकरी
ठळक मुद्देसरकारी मदत हा शेवटचा पर्यायकेंद्र सरकारकडून आणि रिझर्व्ह बँकेकडून सहकार विभागाला सापत्न वागणूकदुष्काळाच्या काळात सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा असे आवाहनसाखर कारखान्यांना कर्ज देऊ नका