सोलापूरजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 11:40 IST2017-09-25T11:27:26+5:302017-09-25T11:40:47+5:30

सोलापूर हैदराबाद महामार्गावर कार व ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली.

Near Solapur, a truck near the truck hit the face and both killed on the spot | सोलापूरजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार 

सोलापूरजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार 

सोलापूर - सोलापूर हैदराबाद महामार्गावर कार व ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाली. या धड्केत दोघे जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. 

दरम्यान, सोमवारी पहाटे पाच वाजता सोलापूर हैदराबाद रोड्वरिल कीर्ती  गोल्डचे समोर बोरामनी शिवारात स्विफ्ट गाडी न, MH 25 L 5550 व ट्रक न CJ 04 DL 8517 ची धडक होऊन त्यामध्ये स्विफ्ट कार मधील भास्कर रामराव कांबळे वय 48, रा, उमरगा, सर्फराज जहांगीर शेख वय 32 रा उमरगा हे मयत झाले असून प्रशांत प्रकाश नवगिरे हा जखमी झाला आहे. 

स्विफ्ट कार सोलापूर वरून उमरगाकडे जात होती, ट्रक हैद्राबाद वरून सोलापुरकडे येत होता.अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरुन बाजूला केले असून, वाहतूक सुरळीत सुरु असून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. अपघातस्थळी पोलीस निरिक्षक किशोर नावंदे यांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Near Solapur, a truck near the truck hit the face and both killed on the spot

टॅग्स :Accidentअपघात