राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक; आगामी विधानसभेबाबत सविस्तर चर्चा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 03:55 IST2019-06-01T03:55:18+5:302019-06-01T03:55:40+5:30

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ...

NCP's meeting today; Detailed discussions will be held in the coming assembly | राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक; आगामी विधानसभेबाबत सविस्तर चर्चा होणार

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक; आगामी विधानसभेबाबत सविस्तर चर्चा होणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिले आहे. शनिवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार असून त्यामध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा, विधानसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा होणार असल्याचेही ते म्हणाले.

दुपारी २ वाजता बैठक होणार असून त्यामध्ये आमदार, खासदार आणि निवडणूक लढलेले नेते व कार्यकारिणीतील लोक उपस्थित असतील. त्यात लोकसभा आणि आगामी विधानसभा याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले. गुरुवारी दहा जनपथ येथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर देशात उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले होते. त्यावर मलिक यांनी दोन्ही नेत्यांच्या भेटीची स्पष्टता मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात आगामी विधानसभा निवडणूक आणि राज्यातील भीषण दुष्काळ यावर सविस्तर चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

Web Title: NCP's meeting today; Detailed discussions will be held in the coming assembly