शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

उपमुख्यमंत्री अजितदादांची उद्धव ठाकरेंवर सरसी; बहुमत असूनही राष्ट्रवादीचा शिवसेनेला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 00:11 IST

खेड पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. १०१ दिवस पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर होते.

ठळक मुद्देभगवान पोखरकर यांचा अर्ज अवैध, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा राजकीय डाव यशस्वीखेड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीचे अरुण चौधरी बिनविरोधअल्पमतात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करून पदाची रणनीती मोहिते पाटील यांना जमली आणि त्यांच्या पुढे शिवसेना पुरती नमली असे मानले जात आहे

राजगुरूनगर : अत्यंत चुरस आणि तणावपूर्ण वातावरणात झालेल्या खेड पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण संभाजी चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. सभागृहात शिवसेनेचे बहुमत आहे. पक्षाचे माजी सभापती भगवान नारायण पोखरकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

खेड पंचायत समिती सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. १०१ दिवस पंचायत समिती सदस्य राजकीय सहलीवर होते. अविश्वास ठराव मंजुरी व त्या दरम्यान झालेल्या अनेक राजकीय घडामोडी, न्यायालयीन दखल यामुळे हा अविश्वास ठराव गाजला. सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यात यावरून गेले तीन महिने राजकीय कलगीतुरा रंगला होता.

सभापती भगवान पोखरकर हे कारागृहात असल्याने पोलीस बंदोबस्तामध्ये ते निवड सभेला उपस्थित होते. त्यांनी अर्ज दाखल केला.  मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी, प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी पोखरकर यांचा अर्ज अवैध ठरविला. नवनिर्वाचित सभापती चौधरी यांना  शिवसेनेच्या बंडखोर ५ सदस्य तसेच भाजपचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांचा पाठिंबा होता. शिवसेनेच्या या ५ बंडखोर सदस्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोखरकर यांना मतदान करण्यासाठी आदेश दिला होता. मात्र, बिनविरोध निवड झाल्याने या आदेशाचा उपयोग झाला नाही. यापूर्वी अविश्वास ठराव संमत होताना असाच आदेश देण्यात आला होता. मात्र पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या या सदस्यांनी जुमानले नव्हते. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अरुण चौधरी यांनी सभागृहात येऊन अर्ज दाखल केला. त्यांना वैशाली गव्हाणे यांनी सोबत येऊन सुचक म्हणून स्वाक्षरी केली.

काही वेळाने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भगवान पोखरकर यांचे पिंजरा गाडीत आगमन झाले. काँग्रेसचे माजी उपसभापती अमोल पवार, सेनेचे ज्योती अरगडे, मचिंद्र गावडे तत्पूर्वी सभागृहात दाखल झाले होते. आरगडे यांनी सुचक म्हणून स्वाक्षरी केली. दोन वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. मात्र, नागरिकांच्या मागास प्रवर्ग प्रमाणपत्राची पडताळणी नसल्यावरून पोखरकर यांच्या अर्जावर चौधरी यांनी आक्षेप घेतला.  जात प्रमाणपत्र पडताळणी नसल्याचे कारण देत अर्ज अवैध ठरवल्याचे प्रांताधिकारी चव्हाण यांनी सांगितले.  

अल्पमतात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा सभापती करून पदाची रणनीती मोहिते पाटील यांना जमली आणि त्यांच्या पुढे शिवसेना पुरती नमली असे मानले जात आहे. खेड पंचायत समितीत शिवसेना व मित्रपक्ष मिळून १४ पैकी १० सदस्यांचे बहुमत आहे. इतरांना संधी मिळावी म्हणून माजी सभापती भगवान पोखरकर यांनी राजीनामा द्यावा असा आग्रह धरला होता. यावरून सेनेच्या ६ सदस्यांनी  बंडखोरी केली. नंतर एक सदस्य स्वगृही परतले. ५ सदस्यांनी आमदार मोहिते पाटील यांच्या आश्रयाला जाणे पसंत केले. हे सदस्य राजकीय सहलीला असताना त्यातील काहींना परत आणण्याचा प्रयत्न करताना त्या हॉटेलवर भगवान पोखरकर यांनी गोंधळ घातला. त्यावरून त्यांच्या सह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

पोखरकरसह काही जण अद्याप तुरुंगात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेच्या खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील खेड तालुक्यावर लक्ष केंद्रित केले होते. महाआघाडी सरकारच्या दोन पक्षाच्या नेतृत्व लढाईत  आमदार मोहिते यांच्या माध्यमातून अखेर अजित  पवारांची सरसी ठरली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना