शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:20 IST

NCP SP Group MP Supriya Sule News: बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

NCP SP Group MP Supriya Sule News: आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणाला वेग येताना दिसत आहे. एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससुप्रिया सुळे यांनी हिंजवडी येथे रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, विकासकामांमध्ये कुठलेही राजकारण करणार नाही. सरकारने या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हिंजवडीतील प्रश्नांबाबत वारंवार वेळ मागितली आहे. पत्रव्यवहार केलेला आहे. हिंजवडीचा विकास झाला पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही

५ जुलै रोजी ठाकरे बंधूंच्या मुंबईतील विजयी मेळावा होणार आहे. अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकाच मंचावर येत असल्याने या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यश आणि अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. ठाकरे हे केवळ आडनाव नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे देशासाठी आणि राज्यासाठी योगदान राहिलेले आहे. जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा याचा उल्लेख होईल. मोठ्या विश्वासाने आणि शून्यातून त्यांनी शिवसेना उभी केलेली आहे. ठाकरे ब्रँड कुणीही संपवू शकत नाही. कुठलीही ताकद संपवू शकणार नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर त्यांचे मनापासून स्वागत करते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावर ०५ जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा घेत आहेत, यात तुमचा पक्ष सहभागी असणार का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही. आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले होते. ते म्हणाले होते की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार यांनी सांगितले. तुम्ही या मेळाव्याला जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर शरद पवार यांनी नकारात्मक उत्तर दिले. नाही. मी त्या मेळाव्याला जाणार नाही. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे