Sharad Pawar: सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे संकेत; जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 16:09 IST2023-05-05T16:09:16+5:302023-05-05T16:09:46+5:30
Sharad Pawar: शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

Sharad Pawar: सिल्व्हर ओकवरील बैठकीनंतर शरद पवारांचे मोठे संकेत; जयंत पाटलांनी दिली महत्त्वाची अपडेट
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार घेत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. यातच शरद पवारांनी निवडलेल्या समितीची बैठक झाली. या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला. शरद पवारांनीच अध्यक्ष राहावे असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत काय झाले, याची माहिती शरद पवार यांनी दिली.
शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी कार्यालयात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवेळी राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव एकमताने नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाच्या अध्यक्षपदी ते कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. कोट्यवधी जनतेच्या निर्णयाचा आदर करून शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती आम्ही करत आहोत असा ठराव समितीच्या बैठकीत मंजूर केला असल्याची माहिती समितीचे निमंत्रक प्रफुल पटेल यांनी दिली आहे. यानंतर सिल्व्हर ओकवर बैठक झाली.
जयंत पाटील यांनी काय माहिती दिली
निवड समितीने मांडलेल्या ठरावर शरद पवार यांनी विचार करण्यास वेळ मागितला आहे. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. तातडीने निर्णय घेण्याची विनंती शरद पवार यांना करण्यात आल्याचे जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. शरद पवार यांनी निवड समितीतील सदस्याचे म्हणने ऐकून घेतले आहे. त्यामुळे ते आता निर्णय घेणार आहेत. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली. देशभरता शरद पवार यांनी अध्यक्ष पदावर कायम राहावे, अशी मागणी होत आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
----००००----