राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 19:24 IST2025-11-20T19:08:30+5:302025-11-20T19:24:29+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे, माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकांची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
सलील देशमुख यांनी प्रकृतीचे कारण देऊन पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना राजीनामा पाठवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा देण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
दरम्यान, त्यांना दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहात का ? असा प्रश्न विचारण्यात आला, यावेळी त्यांनी उद्याची परिस्थिती काय असेल ते माहित नाही. मात्र सध्या प्रकृतीच्या कारणांनी मी राजीनामा देत आहे, असंही ते म्हणाले. त्यांनी गेल्या ५ महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणामुळं राष्ट्रवादी काँगेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देत आहे, असं जाहीर केले.
दरम्यान, आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत का? अशा चर्चा सुरू आहेत.