Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस दुटप्पी कसे वागू शकतात? त्या दिवशी काय घडले, ते फक्त दोन नेते सांगू शकतात”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 14:59 IST2023-02-14T14:58:16+5:302023-02-14T14:59:10+5:30
अशी वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: “देवेंद्र फडणवीस दुटप्पी कसे वागू शकतात? त्या दिवशी काय घडले, ते फक्त दोन नेते सांगू शकतात”
Maharashtra Politics: भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस दुटप्पी कसे वागू शकतात, अशी विचारणा रोहित पवार यांनी केली आहे.
त्या दिवशी काय घडले हे अजितदादा आणि पवार साहेब सांगू शकतात. देवेंद्र फडणवीस साहेब मोठे नेते आहे मी त्यांचा अनुभवाचा आदर करतो. मात्र ते म्हणाले होते काही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीसोबत चर्चा करणार नाही, राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार असं म्हटले या वक्त्यामध्ये कुठेतरी गल्लत आहे, असे रोहित पवार म्हणाले.
सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय का?
शिवसेना फुटली तेव्हा ते म्हणाले ते शिवसेना फोडण्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नाही. मात्र विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवसेना फोडण्यामागचे कलाकार कोण होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी हसतच प्रतिक्रिया दिली. अशी दुटप्पी भूमिका एवढ्या मोठ्या नेत्याची येते याच मला आश्चर्य वाटते. अशी वक्तव्य करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय का, अशी विचारणा रोहित पवारांनी केली.
दरम्यान, निवडणूका होण्याच्या आधीपासूनच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे भाजपाला कट साइज बनवण्याचे षडयंत्र होते. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला. तर महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याच्या चर्चा सुरु झाल्या. अशातच राष्ट्रवादीकडून सरकार स्थापन करण्याची ऑफर आली. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीबाबत गोष्टी ठरल्या. अजितदादा आमच्याकडे आले. त्यांनी जी शपथ घेतली, ती प्रामाणिकपणे घेतली होती. नंतर काय ठरले, ते तोंडघशी पडले, हे आपण सगळ्यांनी बघितले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"