Supriya Sule: "ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना दुखावलं..."; सुप्रिया सुळेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 14:47 IST2022-04-13T14:46:40+5:302022-04-13T14:47:01+5:30
Supriya Sule: 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती महत्वाचा आहे, हे राज ठाकरेंच्या भाषणातून अधोरेखित होतं.'

Supriya Sule: "ज्या व्यक्तीने बाळासाहेबांना दुखावलं..."; सुप्रिया सुळेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी काल(दि.12) ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासह त्यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
'राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंना दुखावलं'
''राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात तरुणांच्या खऱ्या प्रश्नांवर भाष्य केल्याचे मी कधीच ऐकले नाही. आज देशासमोर आणि राज्यासमोर महागाई आणि रोजगारासह अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, पण राज इतिहासात रमले आहेत. ज्या व्यक्तीने हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुखावलं, त्या व्यक्तीविषयी मी काय बोलणार?'' अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
'राष्ट्रवादी महत्वाचा पक्ष'
त्या पुढे म्हणाल्या, ''काल मी माझ्या मतदारसंघात होते, त्यामुळे राज यांचे संपूर्ण भाषण ऐकण्याची संधी मला मिळाली नाही. मात्र वर्तमानपत्रांतून जे वाचलं, त्यानुसार त्यांनी भाषणात 95 टक्के राष्ट्रवादीवरच बोलले आहेत. त्यामुळे आमचा पक्ष किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होतं."