शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

राष्ट्रवादीच्या निरंजन डावखरे यांचा आमदारकीचा राजीनामा, उद्या भाजपा प्रवेश करणार

By यदू जोशी | Published: May 23, 2018 11:40 AM

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला.

मुंबई- कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी आमदारपदाबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही आज राजीनामा दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून आपण वडिलांच्या माध्यमातून पक्षाची जडणघडण पाहिली होती. त्यामुळे पक्ष सोडताना दुःख होत आहे, असे नमूद करीत आमदार डावखरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून पक्षाबाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. आपली पुढील वाटचाल लवकरच जाहीर करणार असल्याचे डावखरेंनी नमूद केले. निरंजन डावखरे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. 

विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे आमदार डावखरे यांनी आमदारपदाचा राजीनामा आज सुपूर्द केला. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पक्षसदस्यत्वाचा राजीनामा पाठविला. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात 2012 मध्ये झालेली निवडणूक अॅड. निरंजन डावखरे यांनी जिंकली होती. त्यानंतर त्यांनी सहा वर्षांच्या काळात शिक्षक, पदवीधर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच कोकणातील विविध प्रश्न विधान परिषदेत मांडले होते. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अॅड. डावखरे यांनी कामकाजावर ठसा उमटविला होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात माझ्या वडिलांचा सहभाग होता. पक्षाची जडणघडण मी जवळून पाहिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेस ही मला कुटुंबाप्रमाणे होती. त्यामुळे पक्ष सोडताना मला दुःख होत आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पातळीवरील एका गटाकडून सातत्याने डावखरे कुटुंबाविरोधात कारवाया सुरू होत्या. या गटाने 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेचे दिवंगत उपसभापती वसंत डावखरे यांच्या निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया केल्या. मात्र, त्यांच्याविरोधात काहीही कारवाई झाली नव्हती. आताही या गटाकडून आपल्याला सातत्याने स्थानिक स्तरावर डावलले जात होते. अखेर या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसबाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केले. यापुढील वाटचाल आपण लवकरच जाहीर करू, असेही आमदार डावखरे यांनी नमूद केले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाडRamaraje Nimbalkarरामराजे निंबाळकर