शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 13:56 IST

वेगळा मार्ग का निवडला? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं...

NCP Maharashtra Political Crisis: राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) आजचा दिवस खूप मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर आता आज राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे अजित पवारांचा (Ajit Pawar) गट आहे, तर दुसरीकडे शरद पवारांचा (Sharad Pawar) गट आहे. अजित पवार गटाचा वांद्रेतील एमईटी मैदानावर मेळावा सुरू आहे. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली. 

कायदे आम्हालाही कळतात, नियमबाह्य काही केले नाही, पूर्ण विचार करुनच निर्णय घेतले आहेत. सकाळी उठलो आणि निर्णय घेतला, आहे नाही, अशी माहिती भुजबळ यांनी दिली. यासोबतच, 2014 ला स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय का घेतला? अजित पवार यांनी पहाटे शपथविधी का घेतला? त्याच्यामागे कोण होतं? असा सवालही त्यांनी यावेळी केली. 

जयंत पाटलांवर टीकायावेळी भुजबळांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या (Jayant Patil) नेतृत्वावरही टीका केली. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नव्हत्या, महिला अध्यक्षांच्या निवड नाही. दोन दोन चार चार महिने सांगूनही नियुक्त्या झाल्या नाही. शरद पवार यांनी सांगूनही नियुक्त्या होत नव्हत्या. युवक काँग्रेस असो की, महिला काँग्रेस, त्यांना नेतृत्व दिल्यावरच काम सुरू होतं. ही सर्व कामे थांबली होती. सांगूनही कामे होत नव्हती. 

पक्षात सर्व समाजाचे घटक आवश्यक असतात. बहुसंख्य मराठा समाज आवश्यक आहे, ओबीसी समाज आवश्यक आहे, दलित समाज, आदिवासी समाज, मुस्लिम समाज आवश्यक आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं. सर्व समाजाला घेऊन पक्ष जात आहे हे चित्र निर्माण व्हायला हवं होतं, ते झाले नाही, असं म्हणत भुजबळांनी थेट जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.

पवार साहेबच आमचे विठ्ठल, पण...भुजबळ पुढे म्हणतात, आम्ही तुरुंगात जाऊन आलो, त्यानंतर अनेकांनी आमीष दाखवले, पण तरीही शरद पवारांसोबत आम्ही एकनिष्ठ राहिलो. आता हे का झाले? साहेब आमचे विठ्ठल, पण या विठ्ठठलाला बडव्यांनी घेरले आहे. त्या बडव्यांना बाजूला करा आणि आम्हाला आशीर्वाद द्यायला या. आम्ही बाहेर पडलो, ते बडव्यांमुळे. तुम्ही आवाज द्या, त्या बडव्यांना बाजूला करा आम्ही पुन्हा यायला तयार आहोत. नागालँडला परवानगी दिली मग आम्हालाही परवानगी द्या, असंही भुजबळ म्हणाले. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारChhagan Bhujbalछगन भुजबळJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष