शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

Exit Poll: साताऱ्यात राष्ट्रवादीचा दोन्ही राजांना धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 22:13 IST

साताऱ्यातील निकालाकडे राज्याचं लक्ष

सातारा: विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान झालं. राज्यात पुन्हा एकदा युतीचं सरकार येईल, अशी आकडेवारी सर्वच वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमधून समोर आली आहे. न्यूज18 आणि आयपीएसओएसनं केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला तब्बल 243 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर गेल्या निवडणुकीत स्वतंत्र लढूनही प्रत्येकी 40 जागा जिंकणारे काँग्रेस, राष्ट्रवादी यंदा एकत्र लढूनही 50 चा आकडा गाठू शकणार नाहीत, अशी एक्झिट पोलमधील आकडेवारी सांगते. न्यूज18 आणि आयपीएसओएसच्या सर्वेक्षणानुसार पश्चिम महाराष्ट्राशिवाय इतर कोणत्याही विभागात महाआघाडीला दुहेरी आकडा गाठता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र या भागातील अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भक्कम किल्ल्याला खिंडार पडलं. त्यातच लोकसभा निवडणूक झाल्यावर साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी भाजपाचं कमळ हाती धरलं. विधानसभेसोबतच साताऱ्यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील मतदान झालं. याठिकाणी राष्ट्रवादीनं श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील यांच्यासाठी गेल्याच आठवड्यात शरद पवारांनी सभा घेतली. भर पावसात पवारांनी घेतलेल्या सभेची सर्वत्र चर्चा झाली. ही सभा उदयनराजेंना धक्का देणारी ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. लोकसभेला चूक झाली. आता ती सुधारायची आहे, असं आवाहन शरद पवारांनी त्यांच्या सभेत उपस्थितांना केलं होतं. शिवेंद्रराजे यांच्याविरोधात राष्ट्रवादीनं दीपक पवार यांना रिंगणात उतरवलं आहे. साताऱ्यातील जनता अनेकदा राजघराण्याच्या पाठिशी उभी राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच राज्यात महायुतीची हवा असल्यानं शिवेंद्रराजेंचा विजय सोपा मानला जात होता. मात्र न्यूज18 च्या सर्वेक्षणानुसार या ठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. त्यामुळे साताऱ्यात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाsatara-acसाताराsatara-pcसातारा