शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अमृता फडणवीसांचे 'ते' गाणे ऐकल्यानंतर रोहित पवार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 13:02 IST

NCP leader Rohit Pawar showers praise on Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देजागतिक महिला दिनाचं औचित्य साधत 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे.

मुंबई: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) आपल्या गाण्यांसाठी लोकप्रिय आहेत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी मिळालेल्या संधीचा योग्य वापर केल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar comments on Amruta Fadnavis new song kuni mhanale)

यासंदर्भात रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. "काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!", असे रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'महिला दिनाच्या मुहूर्तावर अमृता फडणवीस यांचे नवे गाणे प्रदर्शित झाले होते. 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...' हे अमृता फडणवीसांचे नवीन गाणे प्रदर्शित झाले. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. "कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी... हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्यासाठी!" असे त्यांनी ट्विट केले होते. 

( 'कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी...'; Amruta Fadnavis यांचं नवीन गाणं ऐकलंत का?)

व्हॅलेंटाईन डे निमित्त 'ये नयन डरे डरे' हे गाणे प्रदर्शित  व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) निमित्त अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे रिलीज झाले होते.'ये नयन डरे डरे' असे या नवीन गाण्याचे नाव होते. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवे गाणे पोस्ट केले होते. 

(अमृता फडणवीसांचं Valentine गिफ्ट; ‘हे’ नवीन गाणं ऐकलंय का?)

'ट्रोलर्स'चे केले होते स्वागतअमृता फडणवीस याआधी त्यांच्या 'तिला जगू द्या', या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केले होते. त्यावर अमृता फडणवीसांनी "मी नेहमी ट्रोलर्सचे स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणे थांबवणार नाही. माझे आणखी एक गाणे लवकरच येणार आहे", असे म्हटले होते. 

(अमृता फडणवीसांचं नवं गाणं आलं... "डाव मांडते भीती", पाहा...)

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारण