"कोरोना परिस्थिती लक्षात घेता एक देश एक निती हा कार्यक्रम ठरवण्याची गरज असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही," असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाही, तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक धोरण तयार केलं नाही, तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही," अशी मलिक यांनी व्यक्त केली. मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि धोरणे ठरवावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. "केंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाही. याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात उच्च न्यायालयांनीही वेगवेगळे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालात टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतलाय. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत ती केंद्र सरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय," असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. "भाजपशासित उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढे पैसे कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता," अशी टीकाही नवाब मलिक यांनी केली आहे. सरकार पाकिटमार बनलंयपेट्रोलडिझेलचे दर वाढवून मोदी सरकार लोकांचे खिसे कापत असून हे पाकिटमार सरकार बनलेय असा थेट मलिक यांनी केला. "दिवसेंदिवस पेट्रोलडिझेलचे दर वाढतच आहेत. काही जिल्हयात पेट्रोलचा दर शंभरावर पोचला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे. आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत असे सांगतानाच तेलाची लूट थांबवावी," अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.
... नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही; नवाब मलिकांचा केंद्राला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 13:27 IST
Coronavirus In India : मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि धोरणे ठरवावी, नवाब मलिक यांची मागणी
... नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही; नवाब मलिकांचा केंद्राला टोला
ठळक मुद्दे मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि धोरणे ठरवावी, नवाब मलिक यांची मागणीसरकार पाकिटमार बनलंय असं म्हणत मलिक यांनी केली केंद्रावर टीका