Coronavirus : भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तर प्रदेश, बिहार रामभरोसे : नवाब मलिक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 02:59 PM2021-05-11T14:59:12+5:302021-05-11T15:02:30+5:30

Coronavirus : युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत सापडले मृतदेह. राहुल गांधींनीही या प्रकरणावरून मोदींवर केली होती टीका

ncp leader nawab malik slams bjp uttar pradesh bihar coronavirus deaths incresed covd cases | Coronavirus : भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तर प्रदेश, बिहार रामभरोसे : नवाब मलिक 

Coronavirus : भाजपची भाषा रामराज्याची आणि आता उत्तर प्रदेश, बिहार रामभरोसे : नवाब मलिक 

googlenewsNext
ठळक मुद्देयुपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत सापडले मृतदेह.राहुल गांधींनीही या प्रकरणावरून मोदींवर केली होती टीका

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती. परंतु दोन्ही राज्यांना भाजपने रामभरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 

"उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहेत. यमुना नदीत आणि हमिदपूरच्या नदीत तर गंगा नदीत ४० च्यावर मृतदेह दिसले आहेत. याठिकाणी परिस्थिती चांगली नाही हे यावरून स्पष्ट दिसत आहे. बिहारमध्ये चाचण्या होत नाहीयेत. डॉक्टर नाहीत. लोकं दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होतोय. मृतदेह जाळण्यासाठी लाकडे नाहीत म्हणूनच नातेवाईक त्यांचे मृतदेह नदीत टाकत आहेत ही सत्य परिस्थिती आहे," असेही नवाब मलिक म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पळत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Anil Deshmukh ED : "राजकीय हेतूने आणि सत्तेचा वापर करून अनिल देशमुखांना बदनाम करण्यासाठी कारस्थान"

राहुल गांधींकडूनही टीका 

"नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली. 
 
युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. बिहारनंतर उत्तर प्रदेश, बिहार सीमेवरील गावातही मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. जे पाण्यावर तरंगत होते. कोरोना काळात लाकडांची कमतरता भासत असल्यानं लोकं हे मृतदेह थेट नदीत फेकत असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं. 

Web Title: ncp leader nawab malik slams bjp uttar pradesh bihar coronavirus deaths incresed covd cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.