भाजप आंदोलनासाठी लोक रोजंदारीवर आणणार का? ; मलिकांची भाजपवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 14:41 IST2020-02-18T14:41:04+5:302020-02-18T14:41:43+5:30
भविष्यात भाजपचे 15-20 आमदार सुद्धा निवडणून येणार नसल्याचे सुद्धा मलिक म्हणाले.

भाजप आंदोलनासाठी लोक रोजंदारीवर आणणार का? ; मलिकांची भाजपवर टीका
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात 25 फेबुवारीला राज्यातील सर्वच तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवेशनात घेण्यात आला आहे. तर भाजपकडून काढण्यात येणाऱ्या या मोर्च्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मलिक म्हणाले की, भाजपकडून 400 ठिकाणी करण्यात येणाऱ्या आंदोलनासाठी भाजपकडे तेवढी लोकं आहे का ? भाजपचा फुगा आता फुटलेला असून, आमची सत्तास्थापन होऊन दोन महिने झाली नाही आणि हे म्हणतात आंदोलन करू. भाजपने सत्तेत असताना जे काही केलं त्यामुळे महराष्ट्रात आज हे सर्व घडत आहे. त्यामुळे सुधारणा करण्यासाठी थोडा वेळ लागेल.
भाजपच्या आंदोलनासाठी माणसे पैसे देऊन, रोजंदारीवर येणार आहे का ? असा खोचक टोला त्यांनी भाजपला लगावला. भाजपकडे आता लोकं राहिली नाहीत त्यामुळे, रोजंदारीवर ते लोकं अनु शकतात. कमलाबाईला शिवसेनेने सोडचिठ्ठी दिली असून, आता त्यांच्या सोबत जायला ते तयार नाहीत. भविष्यात भाजपचे 15-20 आमदार सुद्धा निवडणून येणार नसल्याचे सुद्धा मलिक म्हणाले.