एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 00:26 IST2021-07-08T00:15:40+5:302021-07-08T00:26:32+5:30

राष्ट्रवादीचे नेते खडसेंना भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स

ncp leader eknath khadse cancelled press conference due to health issue | एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

एकनाथ खडसे यांची प्रकृती खालावली; आज होणारी पत्रकार परिषद रद्द

मुंबई: भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. 

भोसरी येथील जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांना रात्री ईडीने अटक केली. यामुळे खडसेंना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सक्तवसुली संचलनालयानं एकनाथ खडसें यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी (Bhosari land scam) खडसे यांना युतीच्या सरकार काळात महसूल मंत्री पदही गमवावे लागले होते. यानंतर खडसेंना देखील ईडीने चौकशीला बोलावले होते. या चौकशीला खडसे सामोरे गेले होते. खडसे यांची मुलगी शारदा यांनादेखील ईडीने चौकशीला बोलावले होते. यानंतर त्यांचे जावई गिरीश  चौधरी यांना चौकशीसाठी बोलावले होते. मंगळवारी दिवसभर गिरीश चौधरी यांची चौकशी करण्यात आली. 

यापूर्वी चौधरी यांना अटक
गिरीश चौधरी यांना ईडीनं मंगळवारी रात्री अटक केल्याचं जाहीर केलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यादेखील अडचणी वाढतील की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होतं. झोटिंग समितीने आपल्याला क्लिन चिट दिल्याचे खडसे यांनी सांगितलं होतं. मात्र, पदाचा गैरवापर करून खडसे यांनी या जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. ही जमिन एमआयडीसीची होती असं नंतर समोर आलं होतं.

Web Title: ncp leader eknath khadse cancelled press conference due to health issue