मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 04:51 PM2020-03-09T16:51:55+5:302020-03-09T16:56:43+5:30

सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

NCP leader Chhagan Bhujbal has said that MNS chief Raj Thackeray has create shadow cabinet work to the leaders to keep the mns party functioning mac | मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

मनसेच्या ‘शॅडो कॅबिनेट’वर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली 'अशी' प्रतिक्रिया

Next

मनसेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्ताने वाशीत मेळावा पार पडला. पहिल्यांदाच मुंबईबाहेर पक्षाचा वर्धापन दिनाचा मेळावा होत असून त्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतरही नेते उपस्थित होते. वर्धापनदिनानिमित्त पक्षाची शॅडो कॅबिनेट जाहीर करण्यात आली असून यामध्ये कॅबिनेटमधील नेत्यांवर राज्य सकारच्या विविध खात्यांवर लक्ष ठेवण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मनसेच्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर म्हणाले की, सरकार कोणत्या प्रकारे काम करत आहे. तसेच सरकारविषयी काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे जाणून घेण्याचा अधिकार जसा माध्यमांना आहे त्याचप्रमाणे सामान्य जनतेला देखील आहे. मनसेचे सध्या आमदार व नगसेवक जास्त नसल्यामुळे पक्षाला पुन्हा एकदा भरारी घ्यायची आहे. त्यामुळे काही कामं चालू ठेवण्यासाठी मनसेच्या नेत्यांना राज ठाकरेंनी कामं दिली आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितले.

मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची नावे घोषित केली. त्यामध्ये सरकारच्या प्रमुख खात्यांवरील चांगल्या वाईट हालचालीवर लक्ष ठेवण्याची संबंधित नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात राज्यभरातील प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमध्ये अमित ठाकरे यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

राज ठाकरेंनी आपल्या भाषणात शॅडो केबिनेटच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे देखील कान खेचले. संबंधित खात्यावर देखरेखीची जबाबदारी मिळाली म्हणजे, आपण मंत्री झालो असे कोणाला वाटू नये असेही त्यांनी सांगितले. पैशाचं खातं मिळाल नाही म्हणून हट्ट देखील करू नये अशी कोपरखळी देखील राज ठाकरेंनी यावेळी मारली. शॅडो केबिनेटची जबाबदारी सरकारच्या चुकीच्या कामांवर ताशेरे ओढण्याची असेल. यादरम्यान चांगल्या कामाचं कौतुक देखील त्यांनी करावं असेही राज ठाकरे यांनी सुचवले. तर आरटीआय टाकून ब्लॅकमेल करण्याचा काहींचा धंदा झाला असून यापुढे असे आरटीआय टाकायचे नाही अशी तंबी देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली. 

महाविकास आघाडी सरकारच्या नगरविकास आणि पर्यटन विभागावर अमित ठाकरे लक्ष ठेवतील. महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन विभागाची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आहे. त्यामुळे एका ठाकरेंच्या खात्यावर दुसऱ्या ठाकरेंचा वॉच असेल. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच मंत्री म्हणून काम करत आहेत. तर अमित ठाकरे सक्रिय राजकारणात आल्यापासून त्यांच्याकडे पहिलीच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अमित ठाकरे कसं काम करतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लागलं आहे. 


अशी आहे मनसेची शॅडो कॅबिनेट-

गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन- 
बाळा नांदगावकर
किशोर शिंदे
संजय नाईक
राजू उंबरकर
राहुल बापट
अवधूत चव्हाण
प्रवीण कदम
योगेश खैरे
माजी पोलीस अधिकारी बुद्धिवंत
प्रसाद सरफरे
डॉ. अनिल गजने
अ‍ॅड. रवींद्र पाष्टे
अ‍ॅड. जमीर देशपांडे
अ‍ॅड. दीपक शर्मा
अनिल शिदोरे - जलसंपदा

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-
अनिल शिदोरे
अमित ठाकरे
अजिंक्य चोपडे
केतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-
नितीन सरदेसाई
हेमंत संभूस - (उद्योग)
वसंत फडके
मिलिंद प्रधान
पीयूष छेडा
प्रीतेश बोराडे
वल्लभ चितळे
पराग शिंत्रे
अनिल शिदोरे - वित्त व नियोजन 

महसूल आणि परिवहन- 
अविनाश अभ्यंकर
दिलीप कदम
कुणाल माईणकर
अजय महाले
संदीप पाचंगे
श्रीधर जगताप

ऊर्जा-
शिरीष सावंत
मंदार हळबे
सागर देव्हरे
विनय भोईटे

ग्रामविकास-
अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर
अमित ठाकरे
परेश चौधरी
प्रकाश भोईर
अनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-
संजय चित्रे
अमित ठाकरे
वागिश सारस्वत
संतोष धुरी
आदित्य दामले
ललीत यावलकर

शिक्षण-
अभिजीत पानसे
आदित्य शिरोडकर - उच्च शिक्षण
सुधाकर तांबोळी
चेतन पेडणेकर
बिपीन नाईक
अमोल रोग्ये

कामगार-
राजेंद्र वागस्कर
गजानन राणे
सुरेंद्र सुर्वे

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण- 
रिटा गुप्ता
कुंदा राणे

सहकार आणि पणन- 
दिलीप धोत्रे
कौस्तुभ लिमये 
वल्लभ चितळे
जयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा- 
राजा चौगुले
महेश जाधव
वैभव माळवे
विशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे- 
परशुराम उपरकर
जितू चव्हाण
निशांत गायकवाड

महिला व बालविकास- 
शालिनी ठाकरे
सुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)- 
योगेश परुळेकर
अभिषेक सप्रे
सीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)- 
संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन- 
बाळा शेडगे
आशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार- 
अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास- 
संतोष नागरगोजे
संजू पाखरे
अमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता- 
स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य- 
गजानन काळे
अ‍ॅड. संतोष सावंत
अनिल करपे

ग्राहक संरक्षण-
प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क- 
वसंत फडके

आदिवासी विकास-
आनंद एंबडवार
किशोर जाचक
परेश चौधरी

पर्यावरण- 
रुपाली पाटील
कीर्तिकुमार शिंदे
जय शृंगारपुरे
देवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन- 
अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता- 
अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण- 
विठ्ठल लोकणकर 
अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ- 
इरफान शेख
सईफ शेख
जालीम तडवी
जावेद शेख
अल्ताफ खान

Web Title: NCP leader Chhagan Bhujbal has said that MNS chief Raj Thackeray has create shadow cabinet work to the leaders to keep the mns party functioning mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.