शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 08:16 IST

उद्धव ठाकरेंचं नाव न घेता अजित पवारांचा सवाल

जालना: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राम मंदिरावरील विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ज्यांना अद्याप आपल्या वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. उद्धव ठाकरे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या प्रस्तावित दौऱ्यावरदेखील अजित पवार यांनी तोंडसुख घेतलं. शिवसेनेचे नेते म्हणे 25 नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. ज्यांना वडिलांचं स्मारक अद्याप बांधता आलं नाही, ते अयोध्येत जाऊन काय दिवे लागणार?, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावरदेखील पवार यांनी सडकून टीका केली. गेल्या 20 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. ज्यांना कचरा साफ करता आला नाही, ते राज्य काय चालवणार?, असा खोचक सवाल ही पवार यांनी केला.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरील शिवसेनेच्या भूमिकेवरही अजित पवारांनी कडाडून टीका केली. संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. तर कर्जमाफी हा घोटाळा असल्याची उपरती शिवसेनेला आता झाली आहे. एकूणच यात घोटाळा झाला असेल तर, तुम्हीदेखील या सरकारचाच एक भाग आहात. हे विसरून कसे चालेल?, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीकेची झोड उठविली. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना हे केंद्र सरकार मदत करत आहे. मेहुल चोक्सीला तर एका केंद्रीय मंत्र्यांच्या जावयानं परदेशात जाण्यासाठी मदत केल्याचे पुढे आले आहे, अशा शब्दांमध्ये पवार केंद्र सरकारवर बरसले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस