शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Jitendra Awhad : "बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 13:52 IST

NCP Jitendra Awhad Slams Chandrashekhar Bawankule : "1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं."

भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे (BJP Chandrashekhar Bawankule) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा गड मानल्या जाणाऱ्या बारामतीत मोठं विधान केलं. "राजकारणात गड वगैरे कुणाचा नसतो. अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. कुणाचा गड किंवा वर्चस्व कधीच कायम राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं", असे बावनकुळे म्हणाले. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी बावनकुळे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

"बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. तसेच आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते? असा खोचक टोलाही लगावला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बारामतीचा गड जिंकून दे असं साकडं बारामतीच्या मारूतीच्या देवळात जाऊन आज कुणीतरी घातलं. 60 वर्षे प्रत्येक निवडणूकीचा फॉर्म आदरणीय शरद पवार साहेब ह्याच मारूतीच्या समोर उभे राहून नंतर दाखल करतात. आज तो मारुती देवळाच्या बाहेर येऊन हसत हसत विचारत होता. हे आत्ता आलेले ते कोण होते?"

"बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही, उद्गारली अनेक कुळे केवळ साहेबांमुळे आजही काहीजण परत एकदा शरद पवार साहेब आणि बारामती यांच्याबद्दल बोलतायेत. गड उध्वस्त करू म्हणून वल्गना करताहेत विसर्जन करू म्हणता आहेत अर्थात ते केवळ आपण आणि आपला पक्ष चर्चेत राहावा म्हणून…" असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 

"1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं.त्यानंतर सातत्याने खोटेनाटे आरोप जे कधी सत्यात उतरले नाहीत; ते बेलगाम आणि बेफामपणे करण्यात आले. त्याचा महाराष्ट्राच्या जनतेवर कुठलाच परिणाम झाला नाही" असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार