Maharashtra Politics: “२००९ ला विधानसभा निवडणूक लढू दिली असती तर...”; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:50 IST2023-03-26T15:49:25+5:302023-03-26T15:50:34+5:30
Maharashtra News: राज्यासह देशात आपली सत्ता आहे. मग येथील MIDCमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवा, असे आव्हान धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंना दिले.

Maharashtra Politics: “२००९ ला विधानसभा निवडणूक लढू दिली असती तर...”; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका
Maharashtra Politics: आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींवर टीका केली आहे.
राज्यासह देशात आपली सत्ता आहे. मग तुम्ही शिरसाळा एमआयडीसीमध्ये एखादा तरी उद्योग आणून दाखवा, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना दिले आहे. वंदे भारत ट्रेन बनवण्याचा कारखाना हातातून निसटला. हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प दुसरीकडे गेला ही माझ्यासाठी शेरमेची बाब आहे, असे सांगत, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली, यावर बोलताना, देशात लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली आहे.
२००९ ची विधानसभा निवडणूक मला लढवून दिली असती तर...
काशी विश्वनाथाचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व परळीच्या प्रभु वैद्यनाथाचे आहे. खासदारांना हे माहिती हवे होते, असे सांगत धनंजय मुंडे यांनी शिरसाळा येथील एमआयडीसीवरून पंकजा मुंडेंवर टीकास्त्र सोडले. मी आणलेल्या एमआयडीसीत एक उद्योग आणून दाखवा, मी स्वतः रस्त्यावर उतरून तुमचे स्वागत करेल. २००९ ची विधानसभा निवडणूक मला लढवून दिली असती तर मतदारसंघ पंधरा वर्षे विकासात पुढे गेला असता असे धनंजय मुंडे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"