शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच; शरद पवारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 14:37 IST

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले. असा दावा पवारांनी केला आहे.

ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते - शरद पवारकेंद्र सरकार केवळ आश्वासनं देतं, प्रत्यक्ष काहीच करत नाही - पवारआंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर धुडगूस घातला होता.

सोलापूर - केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावेळी रॅलीतील काही उपद्रवी लोकांनी लाल किल्ल्यावर (Red Fort) धुडगूस घातला होता. यासंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा दावा केला आहे. प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे शेतकरी नव्हते, तर ते सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. ते सोलापूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. (NCP chief Sharad Pawar allegation On BJP about Red Fort Violence)

शरद रावांनी एकदा मनात आणलं तर बरोबर कार्यक्रमच करतात : सुशीलकुमार शिंदे

"प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले, असा दावा करत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप केला आहे. 

केंद्र सरकार केवळ आश्वासनं देतं, प्रत्यक्ष काहीच करत नाही - दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील शेतकरी आंदोलन करत आहेत. मालाला योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार केवळ आश्वासनेच देत आहे. प्रत्यक्षात काहीही करत नाही, असेही पवार म्हणाले. 

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आज सोलापुरात; शेतकरी मेळाव्याला करणार मार्गदर्शन

शरद पवारांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य -  मोदी -तत्पूर्वी लोकसभेत बोलताना, शरद पवारांनीच याआधी केंद्रीय कृषीमंत्री असताना कृषी कायदे लागू करण्यासाठीचे वक्तव्य केले होते. मग आता विरोध का? असा सवाल करत, त्यांनी कृषी कायद्यांसंदर्भात अचानक यू-टर्न कसा घेतला याचे आश्चर्य वाटते, असे मोदी म्हणाले होते.

PM Narendra Modi In Lok Sabha : कृषी कायद्यांबाबत शरद पवार यांनी अचानक यू-टर्न घेतला याचं आश्चर्य; मोदींची टीकाकाय घडलं होतं लाल किल्ल्यावर -केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला नंतर हिंसक वळण मिळाले होते. पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स पाडून आंदोलक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यावर कब्जा केल्यानंतर आंदोलकांनी येथे आपला झेंडा फडकवला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSolapurसोलापूरdelhiदिल्लीRed Fortलाल किल्लाFarmers Protestशेतकरी आंदोलन