Maharashtra Politics: “आता महाराष्ट्रातील जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:07 IST2023-02-19T18:06:30+5:302023-02-19T18:07:19+5:30
Maharashtra News: शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि बाकी लोक फुटले. याची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

Maharashtra Politics: “आता महाराष्ट्रातील जनता ठरवेल कुणाला ठेवायचं आणि कुणाला नेस्तनाबुत करायचं?”
Maharashtra Politics: शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निवडणूक आयोगावर टीका होत असताना, भाजप आणि शिंदे गटाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी यावर भाष्य करताना मोठा दावा केला आहे.
जनता ठरवेल कुठली शिवसेना खरी आहे. त्यासाठी निवडणुका आवश्यक आहेत. मला वाटते की, समाजमाध्यमे यामुळे निशाणी आणि नाव सर्वदूर जाते. शेवटी संघटनेचा प्रमुख कोण आहे, हेच लोक लक्षात घेतात. यावर उदाहरण देताना छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेस फुटली, तृणमूल काँग्रेस झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नवा पक्ष उदयास आला. आता जनता ठरवेल कुणाला ठेवायचे आणि कुणाला नेस्तनाबुत करायचे? असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आले होते
मीडियाशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शिवसेनेतून फुटून ज्यावेळी शिंदेसाहेब आणि बाकी लोक बाहेर पडले. या घटनेची स्क्रिप्ट दिल्लीतून तयार झाली आहे. त्यांच्याकडे अशाप्रकारचे व्यवस्थापन कौशल्य असल्याने या गोष्टी घडून आल्या आहेत. यावर महाराष्ट्रातील जनता काय म्हणते, हे बघावे लागेल, असे सांगताना, आमच्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई अशी काही नावे पुढे केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यातील जे आमदार मंत्री होणार आहे, ते अनेकजण हे सिनिअर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना गळ घालण्यात आली. बाकी काही मला माहिती नाही, असा मोठा दावा छगन भुजबळ यांनी केले.
दरम्यान, अगदी सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्यात आले होते. पण सिनिअर म्हणून ठाकरे यांना गळ घालण्यात आली. शिवाय पवारसाहेबांनी तसा आग्रह केला. म्हणून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आले, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"