राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर, माढा, नगरबाबत मात्र सस्पेन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 03:49 PM2019-03-14T15:49:08+5:302019-03-14T16:07:12+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

NCP announces first list of candidate for Loksabha election | राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर, माढा, नगरबाबत मात्र सस्पेन्स 

राष्ट्रवादीकडून लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर, माढा, नगरबाबत मात्र सस्पेन्स 

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसनेलोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माढा, अहमदनगरसह अन्य जागांवरील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. तसेच हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच उर्वरित नावांची घोषणा येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  आज जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माढा, अहमदनगर, बीड, नाशिक, शिरूर आदी ठिकाणचे उमेदवार पहिल्या यादीत जाहीर झालेेले नाहीत. तसेच मावळमधून पार्थ पवार यांच्या नावावरही आज शिक्कामोर्तब झालेले नाही.

राष्ट्रावादी काँग्रेसचे पहिल्या यादीतील  उमेदवार 
रायगड - सुनील तटकरे
बारामती - सुप्रिया सुळे
 सातारा - उदयनराजे भोसले
कोल्हापूर - धनंजय महाडिक
बुलडाणा - राजेंद्र शिंगणे 
जळगाव - गुलाबराव देवकर 
परभणी - राजेश विटेकर 
ईसान्य मुंबई   - संजय दीना पाटील 
ठाणे - आनंद परांजपे
कल्याण - बाबाजी बाळाराम पाटील 
हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा  
लक्षद्विप - मोहम्मद फैझल

Web Title: NCP announces first list of candidate for Loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.