शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

Amol Mitkari : "लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले, मोदीजी व शहांना नक्कीच खूश केले"; राष्ट्रवादीचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 12:23 IST

NCP Amol Mitkari Slams BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

वेदांता-फॉक्सकॉनने आपला सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. वेदांता रिसोर्स लिमिटेडचे चेअरमन अनिल अग्रवाल यांच्या ट्विटचा दाखला देत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी भाजपावर सडकून टीका केली आहे. ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केला, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. 

लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वेदांत फॉक्सकॉन या प्रकल्पामुळे 26 हजार कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणार होता, मात्र महाराष्ट्राची ही गुंतवणूक गुजरातकडे नेऊन महाराष्ट्राचा मोठा अपमान या सरकारने केला आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

"वेदांत फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडी सरकारने 39 हजार कोटीची सवलत दिली होती तर गुजरात सरकारने 29 हजार कोटीची! तरीही हा प्रकल्प जाणीवपूर्वक गुजरातमध्ये शिंदे सरकारने घालवला. लाखो हिंदू तरुण बेरोजगार केले. यामुळे राज्यपाल आणि मोदीजी व शहा यांना आपण नक्कीच खूश केले आहे" असा खोचक टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे. तसेच लम्पी आजारावरूनही बोचरी टीका केली आहे. "लसींचा स्टॉक गुजरातला पाठवून खासगी डॉक्टरांचा व कंपन्यांचा खिसा भरण्याचे काम एकदम OKK सुरू" असं म्हटलं आहे. 

"एकीकडे शेतकरी हवालदील झालाय परतीच्या प्रवासाने  शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे "लम्पी" नावाच्या आजाराने शेतकऱ्यांची गुरे दगावत आहेत. गावात पशुवैद्यकीय दवाखाने शोभेची वस्तू बनली आहेत .लसीकरणासाठी लशीच उपलब्ध नाहीत. "लम्पी" चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या लसीचा बडेजाव सरकार करत आहे त्या लसीकरणामुळेच अनेक शेतकऱ्यांची गुरेढोरे अस्वस्थ असल्याची बातमी पुढे आली आहे. शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याकरिता कुठल्याही ठोस उपाय योजना सरकारकडून नाहीत."

"ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात पशुधन आहे एखाद्या गावात 500 गुरे असली तर लसीकरण केवळ दहा गुरांचे केले जातेय. लसीकरणाच्या नावाखाली सरकार शेतकरी हिताची पोकळ काळजी दाखवते आहे . लसींचा स्टॉक गुजरातला पाठवून खाजगी डॉक्टरांचा व कंपन्यांचा खिसा भरण्याचे काम एकदम OKK सुरू आहे" असं देखील अमोल मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

 

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस