“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट पर्मनंट हुजरेच राहतील”; अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 04:29 PM2023-07-13T16:29:17+5:302023-07-13T16:30:31+5:30

Amol Mitkari Vs Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिले.

ncp amol mitkari replied jitendra awhad over statement on dcm ajit pawar delhi tour | “दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट पर्मनंट हुजरेच राहतील”; अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका

“दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट पर्मनंट हुजरेच राहतील”; अमोल मिटकरींची आव्हाडांवर टीका

googlenewsNext

Amol Mitkari Vs Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अचानकपणे बंडखोरी केली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. यातच जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा अमोल मिटकरी यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला असून, थेट शब्दांत पलटवार केला आहे. 

खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहेत. मात्र, यात मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. याचसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. 

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला अमोल मिटकरींचे चोख प्रत्युत्तर 

अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोचरी टीका केली. जो माणूस इथे राजासारखे राहत होता, तो माणूस दिल्लीत सुभेदार बनायला चालला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये दादा कालही राजे होते, आजही आहेत आणि उद्याही राजेच राहणार... दादांवर बोलणारे प्रसिद्धी पिसाट कालही दरबारी हुजरे होते,आजही आहेत,आणि पर्मनंट हुजरेच राहतील.., असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वीही शरद पवार यांचा फोटो लावण्यावरून या दोन नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. यावर अमोल मिटकरी यांनी पलटवार केला. शरद पवार जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले होते. 


 

Web Title: ncp amol mitkari replied jitendra awhad over statement on dcm ajit pawar delhi tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.