शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:16 IST

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले अघोरी पूजा करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी केला.

Bharatshet Gogawale:रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्सीखेंच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच भरत गोगावले यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये भरत गोगावले मांत्रिकासोबत दिसत आहेत. या व्हिडिओद्वारे गोगावलेंवर अघोरी पूजेचा आरोप करण्यात आला.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा नवीन व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक अघोरी बाबा मंत्रोच्चार करताना दिसत आहे, तर भरत गोगावले पूजेमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. बाबा भरतशेठ + आघोरी विद्या = पालकमंत्री ?? असं कॅप्शन सूरज चव्हाण यांनी या व्हिडीओला दिलं आहे. रायगडचे पालकमंत्रीपद मिळविण्यासाठी गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप सूरज चव्हाण यांनी केलाय.

त्याआधी ठाकरे गटाच्या वसंत मोरे यांनी भरत गोगावले हे अघोरी पूजा करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर आता सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाकडूनही भारत गोगावले यांना लक्ष्य करण्यात आले. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतःच्या घरात होम हवन करत अघोरी पूजा घातली होती. यासाठी त्यांनी उज्जैन येथील बगलामुखी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्यांना बोलावले होते. या पुजाऱ्यामार्फत त्यांनी घरात अघोरी पूजा घातली होती असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी केला.

मात्र भरत गोगावले यांनी अघोरी पूजेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.'मी कोणतीही अघोरी पूजा केलेली नाही. माझ्या घरी अनेक साधू आणि संत येतात, हा व्हिडिओ त्याचाच आहे. तो चुकीच्या पद्धतीने सादर केला जात आहे,' असं गोगावले यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :RaigadरायगडNCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरे