शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 15:33 IST

NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.

NCP Ajit Pawar Group News ( Marathi News ): गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. यातच आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी याबाबत भाष्य केले असून, सुप्रिया सुळे या गेल्या १५ वर्षांपासून अजित पवार यांच्यामुळे निवडून येत आहेत. आता अजितदादा सोबत नाही म्हटल्यावर मतदारसंघात तळ ठोकावा लागत आहे, या शब्दांत रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना दिसत आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला. नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. यानंतर अमोल कोल्हे यांनीही पलटवार केला. दोघांमधील वादाबाबत दोन्ही गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देताना एकमेकांवर टीका केली. यात आता सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

भावनिक राजकारण आता संपलेले आहे

जे खासदार दादांबद्दल बोलत आहेत, त्या दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणले आहे. दादांमुळेच ते निवडून आले. त्यांच्या अफाट आणि विराट सभांमध्ये रिकाम्या खुर्च्यांशिवाय काही दिसले नाही. भावनिक राजकारण आता संपलेले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचे राजकारण हवे आहे. जे खासदार दादांवर बोलतात, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. ताईंना १० महिने तळ ठोकावा लागला, असे सांगितले तर याचाच अर्थ असा की, दादा होते, तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी यावे लागत होते. दादा सोबत नाही म्हणून १० महिने तळ ठोकावा लागत आहे. दादांवर बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही, या शब्दांत रुपाली चाकणकर यांनी हल्लाबोल केला. 

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा

अजित पवारांनी निर्णय घेतला तो विकासासाठी घेतला आहे. अनेक चांगले निर्णय घेतले अजित पवारांनी घेतले आहे. १८ जानेवारीला मुबंईत महिला मेळावा आयोजित केला आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होणार आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे. यासाठी आम्हाला काम करावे लागेल. आमचे स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSupriya Suleसुप्रिया सुळेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे