शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

“रोहित पवारांना CM व्हायचे, पण जयंत पाटील करेक्ट कार्यक्रम करतील”; अजित पवार गटाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 21:20 IST

NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्याने केला आहे.

NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकता आली. यानंतर अजित पवार गटातील काही नेते आणि आमदार पुन्हा एकदा शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली असून, त्या आता खासदार झाल्या आहेत. यातच रोहित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. पण जयंत पाटीलच करेक्ट कार्यक्रम करतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे. जयंत पाटील यांचा पक्ष उभारण्यामागे वाटा आहे. हा नव्याने आलेला नवखा युवक पहिल्यांदा आमदार झाला. लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार आणि जयंत पाटील यांचे मोठे योगदान आहे. जयंत पाटील हे पक्षाचा पिलर आहेत. रोहित पवार आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आहेत, त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असल्याने आधी अजित पवार आणि आता जयंत पाटील यांना बाजूला सारण्याचे काम करत आहेत, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी टीकास्त्र सोडले.

जयंत पाटील याचा टप्प्यात कार्यक्रम वाजवणार

अजित पवार असतानाही असाच प्रयत्न सुरू होता. अजित पवार यांनी वेगळे काही मागितले नाही. पक्षाची जबाबदारी मागितली होती. रोहित पवारांना अजित पवार यांची जागा घ्यायची होती. जयंत पाटील आता त्यामध्ये अडसर ठरत असल्याने त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रोहित पवारांना पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. म्हणून आता जयंत पाटील यांचा अपमान करायचा आहे. जयंत पाटील यांचा टप्प्यात कार्यक्रम वाजवणार, असे अमोल मिटकरी म्हणाले. 

दरम्यान, रोहित पवारांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली आहे.  रोहित पवार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना आता काही कामधंदा राहिला नाही. विधानसभा तोंडावर आली असल्याने बालिश चाळे सुरू आहेत. उगाच हिरोगिरी करायची कामे सुरू आहेत, अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली. तसेच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवल्यामुळे छगन भुजबळ नाराज झालेले नाहीत. हा निर्णय सर्वानुमते झाला असून, छगन भुजबळांची त्याला मान्यता मिळाली. ते नाराज असते तर त्यांनी सांगितले असते, असे अमोल मिटकरींनी म्हटले आहे.  

टॅग्स :Amol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवारJayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवार