शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न! सांगलीत अनोखे आंदोलन : विवाह सोहळ्यात अमंगलाष्टके

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 1:12 PM

महापालिकेचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरच विशेष प्रेम असल्याने सांगलीच्या शहर सुधार समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न लावून अनोखे आंदोलन केले.

सांगली : महापालिकेचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरच विशेष प्रेम असल्याने सांगलीच्या शहर सुधार समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न लावून अनोखे आंदोलन केले. संतापाचे सूर, नाराजीच्या अक्षता आणि अमंगलाष्टकांच्या साथीने हा विवाह सोहळा पार पडला. सोहळ्याला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. विश्रामबाग येथील दत्तनगर चौकातील ८० फुटी रस्ता वर्षानुवर्षे खड्डेयुक्त असल्याने व अनेकदा मंजूर असूनही त्याचे काम न झाल्याने सांगली जिल्हा सुधार समिती व स्थानिक नागरिक यांनी मिळून आज अनोखे आंदोलन केले. सांगली महापालिका व विश्रामबागच्या ८० फुटी रस्त्याच्या खड्ड्यांचे विधिवत लग्न लावून प्रशासनाचा निषेध केला. सांगलीतील विश्रामबागच्या या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना अपघात झाले आहेत. अनेक वर्षांपासून हे रस्ते मंजूर असल्याबाबत व निविदा प्रसिद्ध झाल्याबाबत महापालिका प्रशासनामार्फत सांगितले जात आहे, परंतु आजपर्यंत कोणतीही कार्यवाही या रस्त्याच्याबाबतीत झालेली नाही. सर्वच नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. या संतापाची दलख घेत सांगली जिल्हा सुधार समितीने महापालिकेचे खड्ड्यांसोबत लग्न लावून दिले. या विवाह सोहळ््यात महापालिका प्रशासनाचा, निष्क्रिय नगरसेवकांचा निषेध  केला.यावेळी सुधार समिती कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, सुरेश मुत्तलगिरी, सुधीर भोसले, विनोद कल्याणी, संतोष भोसले, सतीश जगदाळे, राहुल देवकाते, अजय लोंढे, गोरख पाटील, नीलेश खोत, नाना कनवाडकर, अर्चना मुळे, स्वप्नाली चव्हाण, अ‍ॅड. अरुणा शिंदे, महादेव कुलकर्णी, बाळासाहेब कुमे, अजय देशमुख व दत्तनगर, सर्व नागरिक उपस्थित होते.वर महापालिका, वधू खड्डेबाई-चिरंजीव महापालिका व चि. सौ. कां. खड्डेबाई असा उल्लेख करीत या विवाह सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. या अनोख्या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांमधून महापालिकेच्या निष्क्रियतेबद्दल संतापही व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :Sangliसांगली