'...तर पाकिस्तानात जावे लागेल; या देशात फक्त भगवाच चालणार', सहर शेखवर नवनीत राणांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:13 IST2026-01-23T16:13:15+5:302026-01-23T16:13:43+5:30

Navneet Rana on Sahar Shaikh: AIMIM च्या तरुण नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Navneet Rana on Sahar Shaikh: '...then go to Pakistan; only saffron will work in this country' | '...तर पाकिस्तानात जावे लागेल; या देशात फक्त भगवाच चालणार', सहर शेखवर नवनीत राणांची टीका

'...तर पाकिस्तानात जावे लागेल; या देशात फक्त भगवाच चालणार', सहर शेखवर नवनीत राणांची टीका

Navneet Rana on Sahar Shaikh: नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने १२५ जागा जिंकत सर्वांनाच चकीत केले. या विजयानंतर मुंब्रा येथील पक्षाची तरुण नगरसेविका सहर शेख यांनी ‘मुंब्र्याला हिरवं करुन टाकू’ म्हटल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या विधानावर भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, पाकिस्तानला जावे लागेल, असे विधान केले आहे.

या देशात भगवाच चालेल

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्या, मुंब्र्याला पूर्ण हिरवा करायचा असेल, तर पाकिस्तानला जावे लागेल. या देशात भगवाच चालेल. हिरवे करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांची स्वप्ने कधीच पूर्ण होणार नाहीत. या देशात आमच्यासारखे कार्यकर्ते आणि भक्त आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालते. माझ्या रक्तात शिवाजी महाराजांचे विचार आहेत. जोपर्यंत रक्त आहे, तोपर्यंत या देशातून कोणीही भगवा हटवू शकत नाही.

सहर शेख नेमकं काय म्हणाल्या होत्या?

सहर शेख यांनी आपल्या विजयानंतर केलेल्या भाषणात म्हटले होते, पाच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत विरोधकांना याहीपेक्षा मोठे आणि ठोस उत्तर द्यायचे आहे. संपूर्ण मुंब्र्याला अशा हिरव्या रंगात रंगवायचे आहे की, ते पूर्णपणे पराभूत होतील. पुढील वेळी प्रत्येक उमेदवार AIMIM चाच असेल. यावेळी तुम्ही मजलिसची ताकद पाहिली आहे. ही ताकद आम्हाला अल्लाहने दिली आहे. हे वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

AIMIM चा वाढता प्रभाव

सहर शेख या AIMIM च्या सर्वात तरुण नगरसेविका असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करत आपल्या राजकारणाची सुरुवात केली आहे. या विजयाकडे मुंब्र्यामध्ये AIMIM च्या वाढत्या जनाधाराचे आणि युवा नेतृत्वाच्या यशाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे. समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पक्षासाठी ही मोठी राजकीय उपलब्धी मानली जात आहे.

Web Title : नवनीत राणा ने सहर शेख की आलोचना की: 'पाकिस्तान जाओ, यहां केवल भगवा'

Web Summary : एआईएमआईएम की जीत के बाद सहर शेख के 'मुंब्रा हरा होगा' बयान पर नवनीत राणा ने पलटवार किया। उन्होंने कहा कि भारत में केवल भगवा रंग ही चलेगा।

Web Title : Navneet Rana Criticizes Sahar Shaikh: 'Go to Pakistan, Only Saffron Here'

Web Summary : Navneet Rana rebuked Sahar Shaikh's 'Mumbra will be green' statement after AIMIM's win. She asserted only saffron prevails in India.