शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

निसर्गाचाही विदर्भ, मराठवाड्यात 'लॉकडाऊन'; विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 8:32 PM

राज्यातील बर्‍याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ

ठळक मुद्देराज्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेची लाट;

पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आता निसर्गाने विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात लॉकडाऊन आणला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना घरात बसून राहण्याची वेळ आली आहे़.विदर्भाच्या बर्‍याच ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे.

राज्यातील बर्‍याच ठिकाणच्या कमाल व किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात; तसेच देशात अकोला येथे सर्वाधिक कमाल तापमान ४७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे २०.७ अंश सेल्सिअस होते. राज्यात गेल्या २ दिवसांपासून उष्णतेची लाट आली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील बहुताश ठिकाणच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंश सेल्सिअसने वाढले आहे. मराठवाड्यातही ४ अंश सेल्सिअस, तर मध्य महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणच्या तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे.

इशारा : २६ व २७ मे रोजी विदर्भात बर्‍याच ठिकाणी उष्णतेची लाट, तर तुरळक ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.२८ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.........जळगाव, अहमदनगर, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात २६ व २७ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.नाशिक जिल्ह्यात २६ मे रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.......बंगालच्या उपसागरात महाचक्रीवादळ आल्याने मॉन्सूनची प्रगती गेले काही दिवस थांबली होती. मॉन्सूनचे आगमन अंदमान समुद्रात झाल्यानंतर तो अजूनही तो तेथेच रेंगाळला होता. आता मॉन्सूनच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार झाले असून, २७ मेपर्यंत मॉन्सून बंगालच्या उपसागराचा काही भाग, अंदमान समुद्र, व मध्य बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्याचीशक्यता आहे......राज्यातील प्रमुख शहरांतील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस): 

पुणे- ४०.१/२४.२, लोहगाव- ४१/ २४.३, जळगाव- ४५.३/२९.६, कोल्हापूर- ३७.४/२५, नाशिक- ३९.२/२३.५, सांगली- ३९.७/२४.८, सातारा- ४०.४/२४.७, सोलापूर - ४५/२७.७, मुंबई- ३४.२/२७.१, सांताकु्रझ-  ३३.७/२८.४, अलिबाग - ३३.१/२७.९, रत्नागिरी- ३४.६/२७.७, पणजी- ३५.५/२९.४, औरंगाबाद- ४६/२७.१, नांदेड ४५.५/२८, अकोला- ४७.४/२९.६, अमरावती-  ४६/२८.२, बुलढाणा- ४२.६/२९, ब्रह्मपुरी- ४५.२/२८.५,चंद्रपूर- ४६.८/२७.५, गोंदिया- ४५.८/२८.६, नागपूर- ४७/२६.७, वर्धा- ४६/२९.५़ 

टॅग्स :PuneपुणेTemperatureतापमानweatherहवामान