शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार स्थापनेत राष्ट्रवादी निर्णायक राहील

By admin | Updated: October 10, 2014 05:18 IST

हा सर्व खोटा प्रचार आहे. आमची भाजपाशी कोणतीही जवळीकता, छुपा समझोता वगैरे नाही.

१५ वर्षांनंतर पहिल्यांदा काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार आहे. काय असेल निवडणुकीनंतरचे चित्र?पटेल - यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळतील यात शंका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली याचा फटका काही प्रमाणात दोन्ही पक्षांना बसला असता, पण तिकडे शिवसेना-भाजपातही युती नाही. त्यामुळे फारसा फरक पडणार नाही. उलट काही प्रमाणात फायदाच होऊ शकतो. प्रत्येकासाठी आपली ताकद आजमावण्याची ही संधी आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर पुन्हा आघाडी होईल?पटेल - आम्ही स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा करीत नाही. पण एवढे नक्की सांगतो की, सरकार स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका निर्णायक राहणार आहे. आता परिस्थिती पुढे काय वळण घेते हे सांगता येणार नाही. आज तरी त्याबद्दल जास्त बोलणे योग्य होणार नाही.युती तुटताच आघाडी तुटल्याची घोषणा झाली, यात काही राजकीय समीकरण आहे?पटेल - हा सर्व खोटा प्रचार आहे. आमची भाजपाशी कोणतीही जवळीकता, छुपा समझोता वगैरे नाही. भाजपा-सेनेची युती तुटताच काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटण्याची घोषणा हा केवळ योगायोग आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नामांकन भरण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक होते. त्यामुळे २५ सप्टेंबरच्या रात्री तो निर्णय नाईलाजाने घ्यावा लागला. जागांच्या वाटाघाटीत काँग्रेसने ताणून ठेवल्यामुळे शेवटी आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आल्यास मुख्यमंत्रीपदावर दावा राहणार, अशावेळी कोणाची साथ घेणार?पटेल - ही वेळ प्रत्येकासाठी आपली ताकद आजमावण्याची आहे. यावर आताच काही बोलणे योग्य नाही. परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. सध्या वातावरण आमच्यासाठी सकारात्मक आहे, एवढेच मी म्हणेल.पुरोगामी महाराष्ट्रात अजूनपर्यंत महिला मुख्यमंत्री झाली नाही. संधी मिळाली तर राष्ट्रवादी हा बहुमान पटकावणार का?पटेल - याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वस्वी पक्षाच्या विधिमंडळ समितीचा आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनात आमचा पक्ष योग्य वाटचाल करीत आहे. सध्यातरी त्याबाबत काहीही निर्णय नाही आणि त्यामुळे भावी मुख्यमंत्री आम्ही म्हणून कोणालाही ‘प्रोजेक्ट’ पण करणार नाही.स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्याला राष्ट्रवादीने दूर सारलेले दिसते, याचा फटका बसणार नाही का?पटेल - आम्ही हा मुद्दा दूर सारलेला नाही. जर सर्वसामान्य वैदर्र्भीय जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे असेल तर आमचा त्याला पाठींबाच राहील. त्यामुळे आम्ही स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहोत, असे म्हणणे चुकीचे आहे. वास्तविक या मुद्द्यावर आता भाजपाचाच दुटप्पीपणा समोर येत आहेत. तुम्ही १० वर्षे केंद्रात सत्तेत होते. आता सत्ताबदलानंतर मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळाकडे तुम्ही कसे पाहता?पटेल - मोदी सरकारने सर्वांचा अपेक्षाभंग केला आहे. केवळ भाषण आणि घोषणाबाजीने काम होत नाही. लोकांचे मनोरंजन केल्याने काही होणार नाही. जे बोलतात ते करून दाखवावे लागते. परवा गोंदियात मोदींची सभा झाली. पण पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल, या भागात उद्योगधंद्याची उभारणी, रोजगार निर्मिती याबद्दल ते एक शब्दही बोलले नाही.